मागच्या वर्षी सुपरस्टार अल्लु अर्जुनचा (Allu Arjun) बहुचर्चित ‘पुष्पा द राइज’ सर्वात चर्चेत असलेला आणि गाजलेला चित्रपट ठरला. कमाइचे रेकॉर्ड तोडत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. परंतु चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित न झाल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. मुळ तेलुगू भाषेत असलेला हा चित्रपट मल्याळम, तमिळ, कन्नड, आणि हिंदी भाषांमध्ये डब गेला केला आहे. हिंदी व्यतिरिक्त इतर सगळे व्हर्जन याआधीच प्रदर्शित झाले आहेत. परंतु आता हिंदी भाषिक प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली आहे.
लाखो हिंदी भाषिक प्रेक्षकांनी हा चित्रपट तेलुगू भाषेत इंग्रजी सबटाइटल्स सोबत पाहिला आहे. परंतु हा चित्रपट शुक्रवारी (१४ जानेवारी) ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला गेला. आता हिंदी भाषिक प्रेक्षकही या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक करत आहेत. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अल्लु अर्जुन हा देशभर प्रसिद्द असलेला लोकप्रिय अभिनेता आहे. (allu arjun rashmika mandanna film pushpa hindi streaming now on amazon prime video)
याआधी चित्रपटाने कमाईचा ८० कोटींचा आकडा पार केल्याने आणि अल्लु अर्जुनची लोकप्रियता पाहता, निर्मात्यांनी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर चित्रपटाच प्रदर्शन पुढे ढकलल्याची बातमी आली होती. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटातील गाणी आणि ऍक्शन सीन प्रेक्षकांना भुरळ घालत असुन, त्यामुळेही चित्रपट लोकप्रिय ठरत आहे. १७ डिसेंबर २०२१ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अल्लु अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि फासिल मुख्य भूमिकेत दिसत आहेत. आता हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित झाल्याने चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होणार, हे नक्कीच!
‘अशी’ आहे चित्रपटाची कथा
‘पुष्पा’ चित्रपट आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूच्या सीमेवरील जंगलांमध्ये मिळणाऱ्या दुर्मिळ लाल चंदनाच्या विदेशात होणाऱ्या तस्करीवर आधारित आहे. ही एका अशा व्यक्तीची कथा आहे, जो मजुरी करत करत एक दिवस सगळ्यात मोठा स्मगलर बनतो.
हेही वाचा :