4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुनला (Allu Arjun) अटक करण्यात आली. हैदराबादच्या नामपल्ली कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मात्र, या प्रकरणाची सुनावणी सध्या हैदराबाद उच्च न्यायालयात सुरू आहे. अल्लूच्या अटकेनंतर त्यांनी उच्च न्यायालयाला या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती.
अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर अभिनेत्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिथे सुनावणीनंतर त्याला 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले होते. परंतु आता जामिनावर त्याची सुटका देखील झाली आहे.या अभिनेत्याला पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी एका प्रकरणात अटक केली आहे. 4 डिसेंबरला ‘पुष्पा-2’चे स्क्रिनिंग हैदराबादमधील एका थिएटरमध्ये पार पडले. ज्यात अचानक चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्या अंतर्गत अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली.
अल्लू अर्जुनला कडेकोट बंदोबस्तात त्याच्या घरातून अटक करण्यात आली. यावेळी तो कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याची पत्नी स्नेहा रेड्डी देखील अभिनेत्यासोबत दिसली. अल्लूच्या अटकेनंतर वरुण धवन, पवन कल्याण, चिरंजीवी आणि पायल रोहतगी यांसारख्या स्टार्सनी अभिनेत्याला उघडपणे पाठिंबा दिला आहे.
अल्लू अर्जुन शनिवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास हैदराबादच्या चंचलगुडा सेंट्रल जेलमधून सुटला. तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुन जुबली हिल्स येथील गीता आर्ट्सच्या कार्यालयात गेला. आता तेथून तो घराकडे निघाला आहे. अभिनेत्याला घेण्यासाठी त्याचे सासरे चंद्रशेखर रेड्डी आणि वडील अल्लू अरविंद जेलबाहेर पोहोचले. तेथून कडेकोट बंदोबस्तात ते घराकडे रवाना झाले. त्यांची कारही रस्त्यात दिसली, तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘पुष्पा २’ ५ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल देखील दिसत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत करोडो रुपयांचा व्यवसाय केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख
‘या’ चित्रपटांनी गाजवलंय पन्नासचं दशक, अजूनही पाहिले नसतील, तर नक्की पाहा; राज कपूर यांच्या तीन चित्रपटांचा समावेश