दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रितसाद दिला. या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याच्यासोबत असणारी अभिनेत्री रश्मीका मंदाना यांच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या चित्रपटाची क्रेज आज सुद्धा तेवढीच आहे. चित्रपटातले डायलॉग्स, गाणे यांचा फिवर अजून सुद्धा तरुणांवर आहे आणि ही क्रेज इतक्या सहजतेने उतरली जाईल असं तरी वाटत नाही.
सध्या या चित्रपटातला जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यावर अनेकांनी इंस्टाग्राम रिल्स बनवले आहे. ‘नाम सुनके फ्लॉवर समजे क्या? फायर है मैं, पुष्पा पुष्पराज.. मैं झुकूंगा नहीं साला…’ हा डायलॉग फार प्रसिद्ध झाला. जिकडे तिकडे याच चित्रपटाची चर्चा चालू आहे. पण चित्रपटातला हा डायलॉग आणि अल्लू अर्जुनची ऍक्शन यावर तरुण आणि तरुणी फिदा आहेत. मात्र या चित्रपटात अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ चांगलाच गाजला आणि त्याची ती स्टेप सगळ्यात आधी ‘बिग बॉस १३’ मधील शहनाज गिलने केली होती. (allu arjun stole shehnaaz gill styale in pushpa, video get viral)
शहनाज गिलचा हा व्हिडिओ ‘बिग बॉस १३’ सीजन सुरु असताना दिसला होता. तिच्या चाहत्यांनी याचा चांगलाच अंदाज लावला आहे, जी पूर्णपणे पुष्पाच्या त्या स्टाईलमध्ये आहे. शहनाज एकदम पुष्पराजसारखी तिच्या गळ्याच्या जवळून हात फिरवतानाचा हा व्हिडिओ समोर आला. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, “या व्हिडिओची स्टाईल ही शेहनाज गिलने २०१९ मध्ये बिग बॉस सीझन १३ मध्ये असताना केली होती.” तिचा तो व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट केली की, ‘हिने तर अल्लू अर्जुनच्या आधीच ही पोझ दिली.” तर दुसऱ्याने अशी कमेंट केली की, “ही तर आधीच अशा पोझ देते जे नंतर दृष्टिकोनास पडते.” शहनाजच्या चाहत्यांनी तिला या व्हिडीओला भरभरून प्रेम दिले जात आहे.
हेही वाचा :