Tuesday, February 18, 2025
Home अन्य ‘लाज वाटत नाही का?’ म्हणत ‘बबिता- बबिता’ ओरडणाऱ्या प्रेक्षकांवर भडकले होते जेठालाल; पाहा व्हिडिओ

‘लाज वाटत नाही का?’ म्हणत ‘बबिता- बबिता’ ओरडणाऱ्या प्रेक्षकांवर भडकले होते जेठालाल; पाहा व्हिडिओ

टेलिव्हिजन जगतात अनेक लोकप्रिय मालिका आहेत. या मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने नेहमीच तिचे वर्चस्व सिद्ध केले आहे. 2008 पासून म्हणजेच गेल्या 13 वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ही मालिका सगळ्या मालिकांमध्ये सुपरहिट ठरली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि त्यांची भूमिका. मालिकेत असणाऱ्या प्रत्येक पात्राची एक वेगळीच खासियत आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेने दर्शकांना आपलेसे केले आहे.

काही दिवसांपूर्वी तारक मेहताची टीम एका कार्यक्रमाला गेली होती. यामध्ये दिलीप जोशी, दिशा वकानी, मयूर वकानी, शाम पाठक, भाव्या गांधी हे सगळे कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. यामध्ये हजोरो चाहते त्यांच्या आवडीच्या कलाकाराला बघण्यासाठी गर्दी करत होते. त्यावेळी प्रत्येक कलाकाराने आपल्या मालिकेतील पात्राप्रमाणे सगळ्यांशी ओळख केली.

जेव्हा दिलीप जोशी हे हातात माईक घेऊन बोलण्यासाठी पुढे आहे, तेव्हा सगळेजण ‘बबिता, बबिता’ म्हणून ओरडायला लागले. या मालिकेमध्ये दिलीप जोशी हे जेठालाल नावाचे पात्र निभावतात. त्यांना या मालिकेतील बबिता खूप आवडत असते. त्यामुळे सगळेजण बबिताचे नाव घेऊन त्यांना चिडवत असतात, तेव्हा दिलीप जोशी मस्तीच्या मूडमध्ये म्हणाले की, “लाज वाटत नाही का तुम्हाला? लग्न झालेलं असतानाही बबिताचे नाव घेताय.”

दिलीप जोशी यांनी त्यांचा मित्र आणि अभिनेता अमित मिस्त्री यांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली होती. दिलीप जोशी आणि अमित मिस्त्री यांनी 2004 मध्ये ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातच त्या दोघांची चांगली मैत्री झाली होती. पण त्यांचे 23 एप्रिल, 2021 ला हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

दिलीप जोशी यांनी त्यांच्या मित्राची आठवण काढत लिहिले होते की, “आज आमची साथ तुटली आहे. त्याच्या आठवणी नेहमीच माझ्यासोबत राहतील. अमित आणि त्याची बुद्धिमत्ता नेहमीच आठवणीत राहील. त्याच्यासोबत काम करणे आणि आणि त्याचा अभिनय पाहणे खूप आनंदाची गोष्ट होती. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि ईश्वर आम्हाला या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी ताकद देवो.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार ऋतिक रोशनने ‘फायर’ गाण्यावर डान्स करत स्टेजवर लावली आग, थ्रोबॅक व्हिडिओला २ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

-अचंबित! टायगर श्रॉफने खतरनाक स्टंट करत मारली पाण्यात उडी, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना आहे ‘द कपिल शर्मा शो’ची खूप मोठी फॅन, म्हणाली…

-दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन कोरोनाच्या विळख्यात, चाहत्यांसाठी दिला खास संदेश

हे देखील वाचा