दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांच्या अभिनाइतकीच त्यांच्या खासगी आयुष्याचीही सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली दिसते. यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जनचे (Allu Arjun) नाव पहिल्यांदा घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाइतकाच तो त्याच्या लोकप्रियतेसाठीही ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांइतकीच त्याच्या खासगी आयुष्याचीही त्याच्या चाहत्यांमध्ये जोरदार उत्सुकता लागलेली असते. मात्र सध्या अल्लू अर्जूनची नव्हेतर त्याच्या पत्नीच्या व्हायरल फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अल्लू अर्जूनच्या पत्नीचा मनमोहक लूक पाहून नेटकरी मोहित झाले आहेत.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अल्लू अर्जून हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि डॅशिंग लूकने त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्लू अर्जूनच्या दमदार अभिनयाची तर चर्चा सिने जगतात होत असतेच त्याचबरोबर त्याची पत्नी स्नेहा रेड्डीही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. सध्या स्नेहाच्या अशाच मनमोहक फोटोंची चर्चा होताना दिसत आहे.
View this post on Instagram
स्नेहा रेड्डीने अलिकडेच नवीन फोटोशूट केले आहे ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये स्नेहा काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. फोटोमधील तिचे मनमोहक सौंदर्य आणि फिटनेस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. स्नेहाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी तिच्यापुढे अभिनेत्रीही फिक्या पडतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान अभिनेता अल्लू अर्जुन ज्याप्रमाणे तामिळ सिनेसृष्टी गाजवत असतो. त्याचप्रमाणे त्याची पत्नी स्नेहा प्रसिद्ध उद्योजिका म्हणून लोकप्रिय आहे. तिचे वडील इंस्टिट्यूट ऑफ साइंटिफिक टेक्नोलॉजीचे चेअरमन आहेत. वडिलांप्रमाणेच स्नेहाही यशस्वी उद्योजिका आहे. आपला बिजनेस सांभाळत सांभाळत ती दोन्ही मुलांकडेही लक्ष देत असते.
हेही वाचा –‘अशा मुलींपासून लांब राहा’, शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांचा व्हिडिओ चर्चेत
‘जितका त्याचा टॅक्स, तेवढा तर माझा पगारही नाही’, अक्षयसोबतच्या तुलनेवर प्रसिद्ध अभिनेत्रीचे भाष्य
ओळखलं का मंडळी? फोटोमध्ये दिसणाऱ्या गोड मुलीला, सोज्वळ सौंदर्याने मराठी सिनेसृष्टीला लावले आहे वेड