‘जितका त्याचा टॅक्स, तेवढा तर माझा पगारही नाही’, अक्षयसोबतच्या तुलनेवर प्रसिद्ध अभिनेत्रीचे भाष्य

कलाविश्वात असे अनेक कलाकार असतात, जे वर्षातून एखाद्या सिनेमात काम करतात. तसेच, काही कलाकार असेही असतात, जे वर्षातून ५ किंवा त्याहून अधिक सिनेमात काम करतात. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू हिचाही समावेश होतो. तापसी दरवर्षी ४-५ सिनेमात काम करते. त्यामुळे तिची तुलना बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार याच्याशी केली जाते. मात्र, असे असले तरीही तापसी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप हे दोघेही अक्षयसोबत केलेल्या तिच्या तुलनेला चुकीचे म्हणतात. तापसीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

‘मी तर आसपासही नाही’
तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हे दोघेही रेडिओ जॉकी (आरजे) सिद्धार्थ कन्नन (Siddharth Kannan) याच्या शोमध्ये पोहोचले होते. यादरम्यान सिद्धार्थ याने तापसी हिला विचारले की, तिला ‘लेडी अक्षय कुमार’ म्हटले जाते. कारण, ती खूप सारे सिनेमे एकसोबत करते. याचे उत्तर देताना तापसी म्हणाली की, “मी खूपच कृतज्ञतेने ही प्रशंसा स्वीकारली असती, जर मलाही तेवढे पैसे मिळाले असते. तोपर्यंत कृपया करून असे म्हणू नका. ते (अक्षय कुमार) सर्वाधिक कमाई करणारे आणि सर्वाधिक कर भरणारे अभिनेते आहेत. मला तर तेवढेही मिळत नाहीत. मी त्यांच्या आसपासही नाहीये.”

याच प्रश्नाचे उत्तर देताना दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाले की, “तो (अक्षय कुमार) जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक श्रीमंत अभिनेता आहे.”

किती सांगितली अक्षयची कमाई?
फोर्ब्स इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, अक्षय कुमार हा एकमेव भारतीय आहे, जो फोर्ब्स यूएसच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या सन २०१९च्या यादीत सामील झाला आहे. सन २०२०मध्ये अक्षय हा सहावा सर्वात श्रीमंत अभिनेता असल्याचे सांगितले गेले होते. या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले होते की, अक्षय वर्षाकाठी ३८५ कोटी रुपयांची कमाई करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

अनुराग कश्यप यांच्यासोबत तापसी पन्नूचा तिसरा सिनेमा
तापसी पन्नू हिने अक्षय कुमार याच्यासोबत ३ सिनेमात काम केले आहे. ती अक्षयसोबत ‘बेबी’, ‘नाम शबाना’, आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या सिनेमात झळकली आहे. आता तिच्या आगामी सिनेमाबाबत बोलायचं झालं, तर ती १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘दोबारा’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले आहे. अनुराग यांच्यासोबत तापसीचा हा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी तिने ‘मनमर्जियां’ आणि ‘सांड की आंख’ यांसारख्या सिनेमात काम केले होते. या सिनेमांची निर्मिती अनुराग कश्यप यांनी केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
ओळखलं का मंडळी? फोटोमध्ये दिसणाऱ्या गोड मुलीला, सोज्वळ सौंदर्याने मराठी सिनेसृष्टीला लावले आहे वेड
‘माझी सेक्स लाईफ खूप…’ करण जोहरच्या शोमध्ये न जाण्याचे तापसी पन्नूने सांगितले विचित्र कारण
शूट आधी पंपिग मशीननं ब्रेस्ट मिल्क काढताना दिसली अभिनेत्री, व्हायरल फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Latest Post