मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयासोबतच आपला दागिन्यांचा व्यवसाय उत्तम पद्धतीने सांभाळणाऱ्या प्राजक्ताचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अभिनय, सूत्रसंचालन, कवियत्री आता उद्योजिका अशा सर्वच माध्यमांमध्ये प्राजक्ता यशस्वीरीत्या काम करते. तिचे सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे. सध्या अभिनयापासून लांब असूनही सतत सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या प्राजक्ताच्या फॅन्सची खूप मोठी फौज आहे. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असते.
प्राजक्ताने (Prajakta Mali) सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. बुधवारी (14 जून ) महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. इतकंच नव्हे तर काही कलाकारांनी देखील राज ठाकरे यांच्यासाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ताने तिच्या इंन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना प्राजक्ताने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्राजक्ता राज ठाकरे यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
पोस्ट शेअर करताना प्राजक्ताने लिहीले की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मा. श्री. राजसाहेबांना वाढदिवसाच्या आभाळभरचेशुभेच्छा.. इथून पुढील सर्वच वर्ष, खासकरून हे वर्ष आपल्या आयूष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरो… ” अभिनेत्री प्राजक्ताचे आणि राज ठाकरे कुटुंबियांचे नात पुर्वीपासूनच चांगले आहे.
प्राजक्ता माळी विषयी बोलायत झाल तर, तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रानबाजार’ या सिरीजमध्ये तिने साकारलेल्या बोल्ड भूमिकेची प्रचंड चर्चा झाली होती. प्राजक्ता खऱ्या अर्थाने अष्टपैलू अभिनेत्री आहे. प्राजक्ता सतत नवनवीन प्रयोग करताना दिसते. (Amazing post written by Prajakta Mali for Raj Thackeray)
अधिक वाचा-
–शिल्पा शेट्टीचा ‘ताे’ बाेल्ड फाेटाे व्हायरल, अभिनेत्री राखी सावंत कमेंट करत म्हणाली…
–‘द कपिल शर्मा शो’मधील ‘या’ कलाकाराने केला आत्महत्येचा प्रयत्न, नाव ऐकून तुम्हाला बसेल धक्का