Friday, December 1, 2023

‘द कपिल शर्मा शो’मधील ‘या’ कलाकाराने केला आत्महत्येचा प्रयत्न, नाव ऐकून तुम्हाला बसेल धक्का

छोट्या पडद्यावर आतापर्यंत अनेक काॅमेडी शो प्रसारित झाले आहेत. पण ‘द कपिल शर्मा शो’ने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केल आहे. असंख्य चाहते कपिल शर्माच्या विनोदीबुध्दीच नेहमीच तोंडभरुन कौतुक करत असतात. ‘द कपिल शर्मा शो’मुळे विनोदवीर कपिल शर्मा याला झगमगत्यास विश्वात एक विषेश ओळख मिळाली आहे. हा शो सतत चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र आता ‘द कपिल शर्मा शो’ च्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

‘द कपिल शर्मा शो’च्या (the kapil sharma show) एका काॅमेडियने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या बातमीमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. तीर्थानंदने (Actor tirthanand rao) विष पिऊन आत्महत्या (suicide) करण्याचा प्रयत्न केला. त्या अगोदर तो फेसबुक लाईव्हला (facebook live) आला होता. त्यावेळी त्याच्या हातात फिनाईलची बाॅटल होती. 27 डिसेंबर 2021 संध्याकाळी ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर लाईव्ह आल्यानंतर तीर्थानंद एका महिलेबाबत खुलासा केला आहे.

तीर्थानंद म्हणाला की, काही दिवसांपूर्वी माझी आणि एका महिलेतची भेट झाली होती. आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये होतो. पण सोबत राहत असताना मला समजले की, ती एक वेशा आहे. त्यावेळी मी तिच्यापासून दूर गेलो. पण तेव्हा तिने मला धमक्या दिल्या आणि माझ्यावर केस केली. या कारणास्तव मी गेली कित्येक दिवस झाले घरी गेलो नाही. तिच्यामुळे माझ्यावर 3 ते 4 लाख रुपये कर्ज झाल आहे. मला फुटपाथवर झोपण्याची वेळ आली. त्यामुळे मी हे टोकाच पाऊल उचलं आहे.

अभिनेता तीर्थानंद असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ज्युनियर आर्टिस्टचे नाव आहे. पण सुदैवाने तो यातून वाचला आहे. तीर्थानंद ‘द शर्मा शो’मध्ये ज्युनियर नाना पाटेकरची भूमिका साकारताना दिसतो. तीर्थानंदने आधी सोशल मीडियावर लाइव्ह आला आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात नेले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे. (the kapil sharma show comedian Actor tirthanand rao attempted suicide on facebook live because of this woman)

अधिक वाचा-
– एकेवेळी ‘इंडियन आयडल’मधून करण्यात आलेलं रिजेक्ट, मेहनतीने जोरावर स्टार बनलाय ‘जुबिन नौटियाल’ । Jubin Nautiyal
अंकिता लोखंडेशिवाय ‘या’ महिलांशीही होते सुशांतचे संबंध, चौथा क्रमांकाची तर होती हृदयाच्या जवळ । Sushant Singh Rajput 

हे देखील वाचा