Friday, December 8, 2023

शिल्पा शेट्टीचा ‘ताे’ बाेल्ड फाेटाे व्हायरल, अभिनेत्री राखी सावंत कमेंट करत म्हणाली…

बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीला ओळखली जाते. शिल्पाने तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेसने सर्वांनाच वेड लावले आहे. वयाच्या 40 नंतरही शिल्पा तिची फिटनेस टिकवत स्वतःला मेंटेन ठेवताना दिसते. यासाठी खरंच शिल्पाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. शिल्पा सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते. तिचे विविध रिल्स प्रचंड व्हायरल होताना दिसतात.

शिल्पा (Shilpa Shetty) सिनेसृष्टीत फार सक्रिय नसते. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टचे चाहते तोंडभरुन कौतुक करत असतात. नुकतेच शिल्पाने बिकनी परिधान करुन फोटोशूट केल आहे.

नुकत्याच केलेल्या फोटोशूट मधील काही फोटो शिल्पाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत. या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधुन घेतल आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा पाऊसच पाडला आहे. शिल्पाने तिचे हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिल्पा स्विमिंग पूलच्या जवळ बसलेली दिसत आहे.

शिल्पाने ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहीले की, “तापलेल्या सूर्याखाली अंघोळ करतांना..या ठिकाणी दैवी आहे. येथिल पाणी 3 हजार वर्षांपासून पवित्र पाणी म्हणून ओळखले जाते. हे अनुभवताना मनाला खूप आनंद होत आहे.” शिल्पाच्या या फोटोवर चाहतेच काय तर चक्क ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) देखील फिदा झाली आहे. राखीने देखील यावर कमेंट केली आहे. राखीने यावर कमेंट करताना फायर इमोजी शेअर केल्या आहेत.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिचे अनेक प्रोजेक्ट चर्चेत आहेत. लवकरच ही ती ‘केडी’ आणि ‘सुखी’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. याशिवाय शिल्पा बऱ्याच दिवसांपासून रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. (Rakhi Sawant commented on Shilpa Shetty Bald Feta)

अधिक वाचा-
‘द कपिल शर्मा शो’मधील ‘या’ कलाकाराने केला आत्महत्येचा प्रयत्न, नाव ऐकून तुम्हाला बसेल धक्का
एकेवेळी ‘इंडियन आयडल’मधून करण्यात आलेलं रिजेक्ट, मेहनतीने जोरावर स्टार बनलाय ‘जुबिन नौटियाल’ । Jubin Nautiyal 

हे देखील वाचा