ठरलं तर! ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार ‘शाहिद कपूर’, ‘या’ निर्मात्यांसोबत करणार काम


बॉलिवूडमधील कलाकारांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपटांसाठी तगडं मानधन दिलं जातं. यामध्ये आयुषमान खुराणा, अमिताभ बच्चन, विद्युत जामवाल, कुणाल खेमु, आलिया भट्ट, संजय दत्त यांचे अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. या कलाकारांनी ओटीटीवर चांगली रक्कम घेतली होती. त्यामुळे या यादीत आता शाहिद कपूर याचेसुद्धा नाव जोडले गेले आहे.

शाहिदच्या या डिजिटल पदार्पणाबद्दल गेल्या काही काळापासून चर्चा होत होत्या. तो निर्माते राज आणि डिके यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात करणार आहे, अशी बातमी होती. परंतु आता ऍमेझॉन प्राईम व्हिडिओने शाहिदच्या पदार्पणाची पुष्टी केली आहे.

या वेब सीरिजचे शीर्षक अद्यापही निश्चित झालेले नाही. हे एक वेगळ्या प्रकारचे नाटक आहे. ज्यात राज नीदिमोरू आणि कृष्णा डिके हे वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. ही वेब सीरीज सीता आर मेनन, सुमन कुमार आणि हुसेन दलाल यांनी लिहिली आहे. अभिनेता शाहिद कपूर या सीरिजद्वारे डिजिटल पदार्पण करत आहे. याआधी राज आणि डिके यांनी ‘द फॅमिली मॅन’ शो बनवला होता.

आपल्या डिजिटल पदार्पणाबद्दल शाहिद कपूर म्हणाला की, “मी खूप काळापासून राज आणि डीके यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक होतो व आता मला ती संधी मिळत आहे. ‘द फॅमिली मॅन’ हा माझ्या आवडत्या शोपैकी एक आहे. जेव्हा त्यांनी मला ही कथा ऐकवली, तेव्हा त्यांची कल्पना मला फार आवडली.”

यावेळी निर्माता युगल राज आणि डीके म्हणाले की, “प्रत्येक चित्रपट किंवा सीरिजद्वारे काहीतरी चांगलं देणं हे आमच्यासाठी आव्हान होते. ही आमची सर्वात आवडती स्क्रिप्ट आहेच आणि प्रत्यक्षात लेबर ऑफ लव होती. आम्हाला शाहिदद्वारे एक परिपूर्ण अभिनेता मिळाला आहे व तो या सीरिजसाठी नेहमीच आमची पहिली निवड होता. लवकरच सीरिजमध्ये आणखी एक सरप्राईज पात्राची घोषणा देखील केली जाईल.”

ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ भारतचे डायरेक्टर हेड विजय सुब्रमण्यम यांनी सांगितले की, “शाहिद हा हुशार अभिनेता आहे. राज आणि डिके यांच्यासोबत या सीरिजमध्ये तो सामील झाल्यामुळे आम्ही फार उत्साहित आहोत. आम्हाला खात्री आहे की प्रेक्षकांना देखील ही सीरिज नक्कीच आवडेल.”

यात राशी खन्ना ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वरित कलाकारांच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येईल.

शाहिद कपूर सध्या आपल्या ‘जर्सी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जर्सी हा चित्रपट एका तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात तो एका क्रिकेटरची भूमिका साकारत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावरी हो रही है’च्या रंगात रंगला शाहिद कपूर! मजेशीर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

-अगं ताई, तो प्राईजचा टॅग तरी काढ!! अभिनेत्रीने लेबल न काढताच घातला ड्रेस, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पाहा व्हिडिओ

-स्टेजवर डान्स सुरु असताना अभिनेत्रीसोबत घडले असे काही की, अभिनेत्रीसह चाहतेही झाले अवाक्


Leave A Reply

Your email address will not be published.