अगं ताई, तो प्राईजचा टॅग तरी काढ!! अभिनेत्रीने लेबल न काढताच घातला ड्रेस, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पाहा व्हिडिओ


‘बिग बॉस 14′ मधून बाहेर पडलेली स्पर्धक जॅस्मीन भसीनची क्यूटनेस नेहमीच तिच्या चाहत्यांची मने जिंकते. पण नेहमीच लोकांचे प्रेम मिळवणाऱ्या जॅस्मीन भसीनला फिनालेच्या समाप्तीपूर्वीच ट्रोल केले जात होते. वास्तविक, तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती काही विचित्र अंदाजात दिसत आहे. तिच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर बऱ्याच प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

जॅस्मीन भसीनचा हा व्हिडिओ बर्‍याच सोशल मीडिया पेजवर दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर अभिनेत्रीची खिल्ली उडवली जात आहे. दुसरीकडे ती ट्रोलिंगचा शिकार झाली आहे. या व्हिडिओमध्ये तिचा नवीन ड्रेस तर व्यवस्थित होता. परंतु, चूक अशी झाली की ती तिच्या नवीन ड्रेसचा प्राइज टॅग काढायलाच विसरली.

व्हिडिओमध्ये आपण पाहु शकता की जॅस्मीन भसीन जांभळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये समोर येते आणि माध्यमांशी बोलते. दरम्यान, बिग बॉस विजेता म्हणून ती कोणाला पाहू इच्छिते असे तिला विचारले गेले तेव्हा ती तिच्या हसत हसत म्हणाली की, सर्वांनी खूप परिश्रम घेतले आहेत, परंतु विजेता म्हणून मला अली गोनीला बघायचे आहे.’ नंतर असे बोलून ती पुढे जात असते तेव्हा प्राइज टॅग तिच्या पाठीवर लटकलेला दिसतो.

जॅस्मीनचा हा व्हिडिओ व्हायरल भयानीनेही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आता पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये चाहते खूप मजेदार कमेंट्स लिहताना दिसत आहेत. काहीजण याला अली गोनीच्या विजयाचे टेन्शन म्हणत आहेत तर काहीजण याला शो ऑफ आणि पब्लिसिटी स्टंट म्हणून संबोधत आहेत.

दरम्यान बीग बॉस १४ची विजेती रुबीना दिलैक ठरली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.