‘पावरी हो रही है’च्या रंगात रंगला शाहिद कपूर! मजेशीर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल


सोशल मीडियावर कधी कोणाचे नशीब उजळून निघेल हे सांगता येत नाही. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये राहणाऱ्या दानानीर मुबिन या मुलीचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये ती बोलता बोलता पार्टीला ‘पावरी’ म्हणाली. तिच्या त्या चार सेकंदाच्या व्हिडिओला दोन लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. आता तिचे हे वाक्य तिला एका रात्रीत सोशल मीडियावर स्टार बनवायला कारणीभूत ठरले. तिच्या या गाण्याच्या रंगात बॉलिवूडचा सुपरस्टारही रंगले आहेत. यामध्ये बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरचाही समावेश आहे. त्याचा या गाण्यावरील व्हिडिओ भन्नाट व्हायरल होत आहे.

शाहिदनेही या ट्रेंडला फॉलो केले आहे. त्याने आपल्या चित्रपटाच्या सेटवरून एक मजेदार व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये तो ‘पावरी हो रही है’ असे बोलताना ऐकू येत आहे. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या फॅन्सला खूपच आवडत आहे.

शाहिद कपूर सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह आहे. आज-काल तो त्याच्या आगामी प्रोजेक्टती शूटिंग राज आणि डीके यांच्या सोबत करत आहे. अलिकडेच त्याने आपल्या इंस्टाग्रामवर ‘पावरी हो रही है’ या ट्रेंडमध्ये सहभागी होऊन आपल्या मित्रांसोबत हा मजेदार व्हिडिओ बनवला आहे. त्याने आपल्या चाहत्यांना व्हिडिओने प्रभावित केले आहे.

खरं तर ६ फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर दानानीर हिने एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यात तिने ‘हमारी पावरी हो रही है’ हा व्हिडिओ पोस्ट केला होता. तिच्या या व्हिडिओमुळे तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत गेले आणि ती रातोरात प्रसिध्द झाली. भारतीय संगीत निर्माते यशराज मुखाते यांनी या व्हिडिओची दखल घेतली आणि त्यावर एक मजेदार मॅशअप देखील बनविला.

शाहिद कपूर याने आपल्या ‘जर्सी” या चित्रपटाची तारीख आपल्या सोशल मिडियाद्वारे जानेवारीमध्ये सांगितली होती. एकाच दिवशी शाहिद कपूर आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे दोघांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांच्या चित्रपटाला जोरदार टक्कर देणार आहेत. जर्सी हा चित्रपट एका तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात तो एका क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. ज्यात तो हुशार आहे पण अयशस्वी क्रिकेटर आहे. ही भूमिका मूळ चित्रपटात नानीने साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अगं ताई, तो प्राईजचा टॅग तरी काढ!! अभिनेत्रीने लेबल न काढताच घातला ड्रेस, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पाहा व्हिडिओ

-स्टेजवर डान्स सुरु असताना अभिनेत्रीसोबत घडले असे काही की, अभिनेत्रीसह चाहतेही झाले अवाक्

-जाळ आणि धुर संगट! तीन तासांत दहा लाख हिट्स आणि हजारो कमेंट्स, पाहा खेसारीलाल यादवचं होळीगीत


Leave A Reply

Your email address will not be published.