Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड अमिषा पटेल जाणार तुरुंगात? पाहा काय झालाय गंभीर आरोप

अमिषा पटेल जाणार तुरुंगात? पाहा काय झालाय गंभीर आरोप

हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री अमिषा पटेल (Amee सध्या चांगलीच अडचणीत सापडली आहे. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यातून अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात अटक वारंट जारी केले आहे. अमिषा पटेलवर कार्यक्रमाचे पैसे घेवूनही कार्यक्रमाला पोहोचली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. मुरादाबाद मधील एका इव्हेंट कंपनीने अभिनेत्रीवर हा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता मुरादाबाद कोर्टाने २० ऑगस्टला एसीजेएम- ५ कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, उत्तरप्रदेशमधील ड्रिम इव्हेंट कंपनीचे मालक कुमार वर्मा यांनी अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात हा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ला मुरादाबाद मधील एका लग्नात अमिषा पटेलला डान्स करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी तिला ११ लाख रुपयेही देण्यात आले होते. मात्र अभिनेत्री अमिषा पटेलने मात्र या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही, तसेच त्यांचे पैसेही दिले नसल्याचा आरोप करण्यात आला होता. याच गुन्ह्यात आता अभिनेत्रीला अटक वारंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे अभिनेत्री अमिषा पटेल आता चांगलीच अडचणीत आली असल्याची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री आमिषा पटेल ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ९० च्या दशकातील एक गाजलेली अभिनेत्री म्हणून अमिषा पटेलच्या नावाची चर्चा होत असते. अभिनेता सनी देओलसोबत तिचा गदर चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने अभिनेत्रीला नवी ओळख मिळवून दिली होती.  मात्र आता या प्रकरणामुळे अभिनेत्री चांगलीच अडचणीत आली आहे.

दरम्यान अमिषा पटेल सिने जगतात सध्या फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते. त्याचबरोबर ती तिच्या आगामी गदर २ चित्रपटामुळेही चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा –

‘भाभीजी घर पर है ‘मालिकेतील ‘अंगुरी भाभी’ म्हणजेच शुभांगी अत्रेला झाली दुखापत, डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

लंडनमध्येही जपलाय मराठी बाणा, दिग्दर्शक प्रविण तरडेंच्या व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

स्ट्रगलर ते स्टार: वडिलांच घड्याळ विकून ५० रुपये घेऊन मुंबई गाठलेला मुलगा ‘असा’ बनला बॉलिवूडचा सुपरस्टार

 

 

हे देखील वाचा