Friday, April 26, 2024

‘भाभीजी घर पर है ‘मालिकेतील ‘अंगुरी भाभी’ म्हणजेच शुभांगी अत्रेला झाली दुखापत, डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

हिंदी टेलिव्हिजनवरील ‘भाभी जी घर पर है’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. अनेक दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येत आहे. परंतु सध्या या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री असलेली अंगुरी भाभी म्हणजेच  शुभांगी अत्रेला दुखापत झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. या बातमीने मालिकेचे चाहते चांगलेच चिंतेत सापडले आहेत. काय आहे अभिनेत्रीबद्दल ही बातमी चला जाणून घेऊ. 

‘भाभीजी घर पर है’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका इतक्या अप्रतिमरित्या साकारली आहे की घराघरात त्यांना लोकप्रियता मिळाली आहे. याच मालिकेतील सर्वात लोकप्रिय भूमिका म्हणजेच अंगुरी भाभी. आपल्या साध्या सगळ अभिनयाने आणि अडानी व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारुन ही व्यक्तिरेखा घराघरात लोकप्रिय ठरत आहे. मात्र सध्या ही अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.

अभिनेत्री शुभांगी अत्रेला तिच्या घरातील हायड्रोलिक बेड उचलताना ही  गंभीर दुखापत झाली आहे. यावर तात्काळ उपचार केल्यानंतर अभिनेत्रीला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणतीही जड वस्तू उचलण्यातही डॉक्टरांनी अभिनेत्रीला सक्त मनाई केली आहे. शुभांगीच्या या गंभीर दुखापतीमुळे तिचे चाहते चांगलेच काळजीत पडले आहेत. ही बातमी सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच  अनेकांनी अभिनेत्रीला सोशल मीडियावरुन तिच्या तब्बेतीबद्दल विचारपूस केली आहे. दरम्यान अभिनेत्री शुभांगी अत्रेला या आधीही मोठी दुखापत झाली होती. २०१० मध्ये तिला ही दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे तिला आजही त्रास जाणवतो.

शुभांगी अत्रे आपल्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन नेहमीच ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

हेही वाचा –

लंडनमध्येही जपलाय मराठी बाणा, दिग्दर्शक प्रविण तरडेंच्या व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

‘मृत्यू आणि देवाला एकत्रच पाहिले’, अपघातानंतर सुपरहिट ‘बारिश की जाये’ फेम गीतकाराची पोस्ट व्हायरल

फराहची थट्टा उडवणे करण जोहरला भोवले, निर्मातीने व्हिडिओ शेअर करत काढली खरडपट्टी

हे देखील वाचा