Thursday, October 16, 2025
Home हॉलीवूड ब्रेकिंग! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीचे निधन, कलाविश्वात पसरली शोककळा

ब्रेकिंग! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीचे निधन, कलाविश्वात पसरली शोककळा

नुकतंच कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अ‍ॅक्शन ड्रामा सिरिज ’24 FBI’ मध्ये एजंट रेनी वॉकरची भूमिका निभावणारी प्रसिद्ध अभिनेत्री एनी व्हर्शिंगचे निधन झालं आहे.अवघ्या 45 व्या वर्षातच अभिनेतत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या निधनाच्या बातमीने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. 

हॉलिवूडमधील अ‍ॅक्शन ड्रामा सिरिजसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री एनी व्हर्शिंग (Annie Wersching) हिने (दि, 29 जानेवारी) रोजी अखेरचा श्वास घेतला आहे. अनेक दिसवसांपासून अभिनेत्री कॅन्सरसारख्या घातक आजाराशी झुंज देत होती. त्यामुळे तिच्यावर लॉस एंजिलिस रुग्णालयात उपचार सुरु होते जिथे तिने जगाला राम राम ठोकला.

एनीचा जन्म सेंट लुईस मिसौरीमध्ये झाला होता. तिने 2001 साली ‘स्टार ट्रेक एंटर प्राईज’च्या एका एपिसोडपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. वयाच्या 24 व्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रामध्ये पाय ठेवला होता आणि 2020 साली तिला समजले की, तिला कॅन्सरचा आजार आहे.

“The Last of Us,” बनवणाऱ्या नील ब्रुकमैनने ट्वीटर पोस्ट शेअर करत लिहिले की, आम्ही आत्ताच एका सुंदर कालकाराला आणि व्यक्तीला गमावलं आहे. त्यामुळे माझं मन तुटलं आहे, माझ्या भावना त्यांच्या चाहत्यांसोबत आहेत.

sci-fi series “Timeless, सिरिजमध्ये एकत्र काम करणारा अभिनेता अभिरेल स्पेंसर याने देखिल सोशल मीडियावर ट्वीटरद्वारे अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्वीट शेअर करत लिहिले की, एनी व्हर्शिंग आम्ही सगळे तुमच्याशी खूप प्रमे करत आहोत, तुमची खूप आठवण येईल.”

अभिनेत्रीने आपल्या करिअरच्या काळामध्ये अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमाता आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे.  त्याशिवाय त्यांनी “द लास्ट ऑफ अस” या लोकप्रिय व्हिडिओ गेमला आपला आवाजही दिला आहे. अभिनेत्री तिच्या मागे तिचा पती आणि तीन मुलांना सोडून गेली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कधीकाळी नाना पाटेकरांसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री आयशा जुल्का, सध्या करते ‘हे’ काम
मधुबाला आधी ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीला ‘अनारकली’ची मिळाली होती ऑफर, जाणून घ्या कोण आहे ‘ती’ अभिनेत्री

ही बातमी सतत अपडेट होत आहे…

हे देखील वाचा