Monday, February 24, 2025
Home हॉलीवूड धक्कादायक! लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान धाडकन तोंडावरच आपटला प्रसिद्ध रॅपर, वेदनेने विव्हळत होता गायक

धक्कादायक! लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान धाडकन तोंडावरच आपटला प्रसिद्ध रॅपर, वेदनेने विव्हळत होता गायक

हॉलिवूड इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध रॅपर पोस्ट मलोन याच्यासोबत मोठा अपघात झाला आहे. एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान त्याच्यासोबत ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रॅपरसोबत नेमकं घडलं तरी काय चला जाणून घेऊया…

प्रसिद्ध रॅपर पोस्ट मलोन (Post Malone) हा अमेरिकेतील सेंट लुईस येथे एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होता. त्याचवेळी 27वर्षीय गायक स्टेजवरच तोंडावर आपटला. त्याच्यासोबत घडलेलं सर्वकाही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यादरम्यानचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पोस्ट मलोनसोबत मोठा अपघात
खरं तर, नुकताच पोस्ट मलोन हा सेंट लुईसमध्ये एंटरप्राईझ सेंटरमध्ये एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होता. हा एक लाईव्ह शो होता. आपल्या ‘सर्कल’ या गाण्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. त्याचवेळी स्टेजवर पोस्ट मलोनचा पाय मंचावरील एका गिटारच्या छिद्रामध्ये घुसला. यानंतर तो धाडकन तोंडावरच आपटला. खरं तर, ते गिटार त्याच्याच एन्ट्रीसाठी बनवले गेले होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, पोस्ट मलोन कशाप्रकारे दुखापतग्रस्त झाला आहे. मलोन कोसळल्यानंतर लगेच घटनास्थळी उपस्थित गार्ड स्टेजवर आले आणि रॅपरला उचलू लागले. रॅपरला तोंडावर आपटताना पाहणे खूपच वेदनादायी वाटत आहे. इतकेच नाही, तर पोस्ट मलोन कोसळल्यानंतर वेदनेने विव्हळतानाही दिसत आहे. आपल्या आवडत्या गायकाला अशा घटनेचा शिकार होताना पाहून एंटरप्राईज सेंटरमध्ये उपस्थित लोकांमध्ये भयानक शांतता पसरली. यानंतर गायकाला लगेच वैद्यकीय तपासासाठी पाठवण्यात आले.

पोस्ट मलोनचा व्हिडिओ
स्टेजवर पडल्याच्या काही वेळानंतर पोस्ट मलोनने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पोस्ट म्हणत आहे की, “सर्वकाही ठीक आहे. डॉक्टरांनी मला दुखापतीवरचे औषध दिले आहे. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. तुमच्या समर्थनासाठी खूप खूप धन्यवाद. यावेळी माफी मागतो, मी पुन्हा एकदा सेंट लुईसमध्ये लवकरच शो करण्यासाठी नक्की येईल.” पोस्ट मलोनचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसाठी खूपच वेदनादायी आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्यासाठी खूपच वाईट वाटत असल्याचे ट्विटरवरील प्रतिक्रियांवरून दिसते.

पोस्ट मलोनची गाणी
पोस्ट मलोनच्या गाण्यांबद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये ‘सनफ्लावर’, ‘आय लाईक यू’, ‘काँग्रॅच्युलेशन्स’, ‘सर्कल्स’, ‘रॉकस्टार’, ‘बेटर नाऊ’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नवाब सैफचा मजेशीर खुलासा! फार्महाऊसवर कोंबड्या पकडण्यासाठी ठेवलाय ‘कोंबडा’, पाहा व्हिडिओ
‘तर खपवून घेणार नाही…’ मिमिक्री केल्यानंतर उषा नाडकर्णी यांचा थेट श्रेया बुगडेला कॉल
एमएमएस व्हिडिओप्रकरणी अंकिताचे कळकळीचे आवाहन; म्हणाली, ‘आपल्या घरी आई-बहिणी आहेत, कृपया…’

हे देखील वाचा