Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक! जगप्रसिद्ध गायिकेचे 48 व्या वर्षी निधन, काही दिवसांपूर्वीच केला होता आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक! जगप्रसिद्ध गायिकेचे 48 व्या वर्षी निधन, काही दिवसांपूर्वीच केला होता आत्महत्येचा प्रयत्न

अमेरिकन गायिका कोको ली हिने आपल्या आवाजाच्या जोरावर प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. पण तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सगळ्यांना तिच्या गाण्यांच्या तालावर नाचवणारी गायिका आत्महत्या करेल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. गायिका कोकोने वयाच्या 48 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

गायिकेच्या निधनची बातमी समोर आल्यापासून गायकाच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, गायिका कोको (Coco Lee) बर्याच काळापासून नैराश्यात होती. 5 जुलै रोजी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र ती कोमात गेली. आता तिचा मृत्यू झाला आहे. गायिकेची बहीण कॅरोल आणि नॅन्सी ली यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मृत्यूची बातमी दिली आहे.

कोकोच्या बहिणींनी सांगितले की, कोकोने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ती कोमात गेली होती. कोको अनेक वर्षांपासून डिप्रेशनने त्रस्त होता. कोकोने घरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र बुधवारी कोकोचा मृत्यू झाला. निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या चाहते तिला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

दरम्यान, कोको हिता जन्म 1975 मध्ये हाँगकाँगमध्ये झाला. मग ती अमेरिकेला गेली जिथे तिने मिडल स्कूल आणि हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. याआधी तिने आशियातील पॉप गायिका म्हणून अत्यंत यशस्वी कारकीर्द सुरू केली. तिने 30 वर्षांच्या करिअरमध्‍ये कण्टोनीज आणि इंग्रजीमध्‍ये अल्‍बमही रिलीज केले. सोनी म्युझिकने जागतिक स्तरावर साइन केलेली ती पहिली चीनी गायिका होती.2011 मध्ये कोको लीने कॅनेडियन उद्योगपती ब्रूस रॉकोविट्झशी लग्न केले. (American singer Coco has died at the age of 48.)

अधिक वाचा- 
‘इंटिमेट सीन करण्यापूर्वी नवऱ्याशी चर्चा करतेस का?’ प्रिया बापटच मोठ भाष्य, “उमेशपेक्षा…”
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन येणार? श्रेयस तळपदेने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ; एकदा पाहाच

हे देखील वाचा