Tuesday, September 26, 2023

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन येणार? श्रेयस तळपदेने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ; एकदा पाहाच

मागील काही दिवसांपासून मराठी मालिका विश्वामध्ये सर्वात हिट ठरलेली मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. यामध्ये अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांनी काम केले आहे. तर बालकलाकार मायरा वैकुळ हिने अतिशय उत्तम रित्या अभिनय केला आहे. मायरा वैकुळने अभिनय करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील प्रत्येक पात्राने घराघरात ओळख निर्माण केली आहे. सध्या ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

या मालिकेतील यश आणि नेहाचे पात्र खूप गाजले आहे. त्यांच्या पात्रांनी चाहत्यांच्या मनावर भूरळ घातली आहे. आजही चाहते त्यांची मालिका पुन्हा सुरू कधी होणार याची वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका परत येणार असल्याचे बोलले जात आहे. या बद्दल अभिनेता श्रेयस तळपदेने (shreyas talpade) काही संकेत दिले आहेत.

श्रेयस सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरून लाइक आणि कमेंट करत असतात. नुकताच श्रेयसने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत.

श्रेयसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर एकत्र दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना श्रेयसने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वो घड़ी जिसका आप सभी को इंतजार था …. आमची ही रेशीमगाठ कधीही तूटायची नाही!” ही पोस्ट पाहून यश आणि नेहाचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, “खरंच आम्ही वाट पाहतोय. आमची लाडकी मालिका घेऊन लवकर परत ये. हव तर ही विनंती करतो.” त्याच वेळी या व्हिडिओवर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही कमेंट केली आहे. तिने कमेंट करताना लिहिले की, “श्रेयस तळपदे आणि अजय मयेकर सर तुम्हा दोघांसाठी माझ्या तारखा या फ्री आहेत.” त्यामुळी ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

अधिक वाचा- 
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘छिछोरे’ चित्रपटानंतर नितेश तिवारी अन् साजिद नाडियादवाला यांच्या ‘बवाल’ चित्रपटाचा टिझर रिलीज
कपूर कुटुंबातील ‘या’ चिमुकल्यांना ओळखा पाहू, आज आहेत बाॅलिवूडचे प्रसिद्ध स्टार्स

हे देखील वाचा