Saturday, June 29, 2024

आयरा खानच्या रिसेप्शनला का नव्हती सावत्र आई किरण राव? मोठे कारण आले समोर

आमिर खानच्या(Amir Khan) लेकीची म्हणजे आयरा खानच्या लग्नाची  सर्वत्र चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. आयराच्या लग्नाच किरण राव सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी झालेली दिसली होती. मात्र रिसेप्शनमध्ये किरण राव कुठेही दिसली नही.

आयरा खान आणि नुपुर शिखरे यांनी १० जानेवारी रोजी उदयपुरमध्ये लग्न केले. मुंबईच्या एनएमसीसीमध्ये १३ जानेवारीला रिसेप्शन होते. रिसेप्शनला अनेक मोठमोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. पण आमिर खानची एक्स वाइफ किरण राव यासर्व कार्यक्रमात कुठेही दिसली नाही.

का रिसेप्शन नव्हती किरण राव
आयरा खानच्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमांचा किरण राव पहिल्या दिवसापासुन उत्साहाने सहभागी होती. आयराच्या रजिस्टर लग्न ते उदयपुर मधील लग्न सर्वांमध्ये सहभागी होती. परंतु मुंबईच्या एनएमसीसी मधल्या रिसेप्शनला किरण राव कुठेही दिसली नाही.

आमिरने सांगितलं कारण
आमिर खान त्याच्या संपुर्ण परिवारासोबत होता रिसेप्शनमध्ये होता.मात्र या कार्यक्रमाला किरण राव कुठेही दिसत नव्हती. पापाराझींनी यावर आमिर खानला प्रश्न विचारला, त्यावेळी आमिरने सांगितले की, किरण राव यांची तब्बेत ठिक नाही, तीला फीवर आहे.

अनेक सेलिब्रेटींनी लावली हजेरी
सलमान खान, सायरा बानो, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, जुही चावला, सचिन तेंडुलकर, अदिती राव हैदरी, रणबीर कपूर यांच्या सोबत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बाप रे ! अमिताभ बच्चन यांची झाली सर्जरी, अक्षय कुमारने पोस्ट करत दिली माहिती
मालदीव बॉयकॉटनंतर सुपरस्टार नागार्जुन यांनी कॅन्सल केले मालदीवचे प्लॅन; म्हणाला, ‘त्यांनी पंतप्रधानांना ज्या प्रकारे वागणूक दिली…’

 

 

 

हे देखील वाचा