Tuesday, March 5, 2024

बाप रे ! अमिताभ बच्चन यांची झाली सर्जरी, अक्षय कुमारने पोस्ट करत दिली माहिती

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan)  यांनी नुकताच त्यांनच्या हाताच्या सर्जरी बद्दल खुलासा केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही माहीती दिली. अमिताभ बच्चन यांनी सांगितले,की ते इंडीयन स्ट्रीट प्रीमीयर लीग (आईएसपीएल) च्या लॉन्चच्या आधी अक्षय कुमार सोबत शुटींग करत होते. या फोटोंमध्ये शॉट्समध्ये ते अक्षय कुमार सोबत त्यांच्या हाताच्या सर्जरीबद्दल चर्चा करतांना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये, त्यांच्या हाताला मनगटाजवळ पट्टी दिसते आहे. या सर्जरीबद्दल अमिताभ यांनी कोणतीही जास्त माहीती दिली नाही. बिग बिसोबत याफोटोंमध्ये साउथ अभिनेता सूर्या आणि अक्षय कुमार आहेत. एका ऍड शुट दरम्यानची ही फोटो आसल्याचे समजते आहे.

ऑल ब्लॅक लुक

समोर आलेल्या फोटोंमध्ये तिघं अभिनेते काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसतायेत. अक्षय कुमार ब्लॅक रंगाच्या जॉकेट आणि ब्लू जींन्समध्ये खुप छान दिसतो आहे. तर बिग बि प्रिंटेड ब्लॅक रंगाच्या जॉकेटमध्ये आणि सूर्या संपुर्ण ब्लॅक लुकमध्ये ते दोघेही देखणे दिसत आहे.

बिग बिंची सर्जरी बद्दल चर्चा

याफोटोंमध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि सूर्याला काहीतरी समजावतांना दिसत आहे. त्याच बरोबर अक्षय कुमारसोबत हाताच्या सर्जरीबद्दल चर्चा करतांना दिसत आहेत. फोटोंमध्ये बिग बींच्या हाताला पट्टी बांधलेली दिसते आहे, पण याबद्दल जास्त माहिती अद्यप समोर आलेली नाही.

फॅन्स मध्ये चिंता

अमिताभ बच्चन,अक्षय कुमार आणि सूर्याच्या फोटोंना चहात्यांन कडून चांगला प्रतीसाद मिळतो आहे. अनेक चाहत्यांनी याफोटोंवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण, बिग बींच्या हाताच्या सर्जरी बाबत चिंता देखील व्यक्त केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मालदीव बॉयकॉटनंतर सुपरस्टार नागार्जुन यांनी कॅन्सल केले मालदीवचे प्लॅन; म्हणाला, ‘त्यांनी पंतप्रधानांना ज्या प्रकारे वागणूक दिली…’
‘या’ कारणामुळे आशुतोष राणा यांनी शाळेत असताना केली होती पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण, स्वतः केला खुलासा

हे देखील वाचा