Saturday, April 20, 2024

…आणि दिवसभर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली ती बच्चन यांच्या मास्कची, पाहा नक्की ‘तो’ मास्क होता तरी कसा

26 जानेवारी 2021. संपूर्ण देशात 72 वा प्रजासत्ताकदिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला. सर्वसाधारण माणसांपासून ते मोठमोठ्या हस्तींपर्यंत सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. याचदरम्यान चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने पसरत आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांनी एका वेगळ्याच अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ यामुळे व्हायरल होत आहे की, त्यात त्यांनी फेस मास्क घातला आहे, जो सध्या खूपच चर्चेत आहे.

हा एक लाईट वाला मास्क आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हे असे वेगवेगळे मास्क पाहू शकता. ह्या मास्कमध्ये लाईट सोबतच ‘व्हॉईस क्लियारिटी डीवाईस ‘सुद्धा आहे. जेव्हा आपण नॉर्मल मास्क वापरतो तेव्हा बोलताना जरा त्रास होतो परंतु ह्या मास्कमध्ये बोलताना कोणताही प्रॉब्लेम येत नाही. हा मास्क चेहऱ्याला लावून अमिताभ बच्चन यांनी सर्वांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांचा हा मास्क त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. ते सगळे बिग बी यांना विचारत आहेत की त्यांनी हा मास्क नक्की कुठून घेतला आहे. एवढेच नाही तर त्यांचा एक चाहता बोलला की ,हा मास्क काय ते जत्रेतून घेऊन आलेत काय?अमिताभ बच्चन यांच्या ह्या व्हीडिओवर त्यांच्या चाहत्यांनी जबरदस्त कमेंटचा वर्षाव केला आहे.

चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नव-नवीन फोटोज् आणि व्हिडिओज ते सोशल मीडियावर शेअर करून आपल्या फॅन्सला जोडून ठेवतात. प्रजासत्ताकदिनी अश्या वेगळ्याच अंदाजाने शुभेच्छा दिल्यामुळे बिग बी यांचे फॅन्स खूपच खुश झाले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या कामा संदर्भात बोलायला झाल्यास, ते ‘इमरान हाश्मी’ यांच्यासोबत ‘चेहरे ‘आणि ‘नागराज मंजुळे ‘यांच्या ‘झुंडा या चित्रपटाद्वारे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘आयन मुखर्जी ‘ यांच्या ‘ ब्रह्मास्त्र ‘ मध्ये बच्चन रणवीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन आणि मोनी रॉय यांच्यासोबत दिसणार आहेत. तशेच ते मेडे या चित्रपटात सुद्धा दिसणार आहेत. यासोबतच त्यांच्याकडे साऊथचा एक मोठा चित्रपट देखील आहे. ते प्रभास आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबत साऊथचे लोकप्रिय दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या एका येवू घातलेल्या प्रोजेक्टचा भाग असणार आहेत.

हे देखील वाचा