Saturday, June 29, 2024

‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमारांना अखेरचा निरोप देण्यासाठी अभिषेकसोबत कब्रिस्तानात पोहोचले होते अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांचे बुधवारी (७ जुलै) निधन झाले. वयाच्या ९८ व्या वर्षी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. दिलीप कुमार बऱ्याच कालावधीपासून आजारी होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते आणि सेलिब्रेटी श्रद्धांजली वाहत आहेत. दिलीप कुमार यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बरेच सेलिब्रिटी गेले होते.

धर्मेंद्र, रणबीर कपूर, शाहरुख खान, विद्या बालन, अनुपम खेर आदी अनेक मोठे कलाकार सायरा बानो यांचे सांत्वन करायला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. राज्य पोलिसांची बटालियन दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचली होती. त्यांच्या घरून दिलीप कुमारांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. जुहू येथील कब्रिस्तानात त्यांना सुपूर्द- ए- खाक करण्यात आले. शासकीय इतमामात साश्रु नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दफनविधीवेळी सायरा बानोदेखील उपस्थित होत्या.

यावेळी अनेक कलाकार त्यांना निरोप द्यायला कब्रिस्तानात आले होते. यात महानायक अमिताभ बच्चन देखील होते. अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांची मैत्री खूप घट्ट होती. त्यांना अखेरचा निरोप द्यायला अमिताभ हे अभिषेकसोबत उपस्थित होते. त्यांचे अनेक विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमिताभ यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते की, त्यांना त्यांच्या जिवलग मित्राच्या जाण्याचे खूप दुःख झाले आहे.

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अमिताभ यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्या होत्या. त्यांनी लिहिले होते, “जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तो ‘दिलीप कुमार यांच्या आधी आणि दिलीपकुमार यांच्यानंतर’ असा लिहिला जाईल. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.”

दिलीप कुमार जन्म ११ डिसेंबर, १९२२ रोजी झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार यांना The First Khan म्हणून ओळखले जायचे. तसेच त्यांना ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणूनही ओळखले जाते. आपल्या कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी अनेक सिनेमे केले. त्यांना अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर

-वाढदिवशी धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले बिकिनीमधील फोटो; म्हणाली, ‘तू आणि मी…’

हे देखील वाचा