वाढदिवशी धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले बिकिनीमधील फोटो; म्हणाली, ‘तू आणि मी…’


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील राय लक्ष्मी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम यासारख्या चित्रपटात काम करून तिचे नाव कमावले आहे. इतर कलाकारांप्रमाणे राय लक्ष्मी देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे बोल्ड फोटो ती नेहमीच इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना तिचा प्रत्येक अंदाज खूप आवडत असतो. ( M.S. dhoni’s girlfriend ray laxmi share her bikini photo on social media)

अभिनेत्रीने नुकतेच काळ्या रंगाची बिकिनी घालून एक फोटोशूट केले आहे. जे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

राय लक्ष्मी ही भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीची एक्स गर्लफ्रेंड आहे. आज (७ जुलै ) धोनीचा वाढदिवस आहे. या दिवशी तिचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये ती काळ्या रंगाची बिकिनी घालून शॉवर घेताना दिसत आहे. धोनी आणि तिच्या अफेअरच्या चर्चा एके काळी खूप रंगल्या होत्या.

तिने कालचं एक फोटोशूट केले होते. त्यात तिने चष्मा घातला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. फोटो शेअर करून तिने लिहिले होते की, “तू आणि मी जीवनात अनेक गोष्टी जाणून आहोत.”

अभिनेत्री राय लक्ष्मीने वयाच्या केवळ १५ व्या वर्षी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. तिने वेगवेगळ्या भाषांमध्ये ५० पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले आहे. तिने तमिळ चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.

अभिनेत्री राय लक्ष्मीने २०१६ रोजी एक मोठा खुलासा करून सर्वांना हैराण केले होते. तिने सांगितले होते की, ती भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार महेंद्र सिंग धोनीसोबत रिलेशनमध्ये होती. तिने सांगितले की, २००९ मध्ये ती आणि धोनी दोघेही रिलेशनमध्ये होते. ती स्पोर्ट्स प्रेमी आहे. त्यामुळे ती धोनीच्या प्रेमात पडली होती. माध्यमातील वृत्तानुसार, ती धोनी सोबतच्या रिलेशनमध्ये खुश नव्हती. तिने माध्यमांना वेगवेगळी माहिती दिली होती. काहीच्या माहितीनुसार, ते दोघे काहीच महिने रिलेशनमध्ये होते. तर काही माध्यमांच्या वृत्तानुसार, ते दोघे पाच वर्षे रिलेशनमध्ये होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.