Sunday, June 23, 2024

‘केबीसी’चा २१ वर्षांचा प्रवास पाहून पाणावले बिग बींचे डोळे; १०००व्या एपिसोडमध्ये म्हणाले, ‘खेळ अजून संपला नाही!’

‘कौन बनेगा करोडपती’ गेल्या २१ वर्षांपासून स्पर्धकांना त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर लखपती आणि कोट्याधीश बनवत आहे. या शोमुळे अनेकांची स्वप्न पूर्ण झाली आहेत. स्पर्धक घर, कार, पालकांचे उपचार, शिक्षण वगैरे या सर्व इच्छा घेऊन येथे पोहोचले आणि प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी शोचा प्रवास २१ वर्षापर्यंत पूर्ण केला. या शोचे होस्ट अमिताभ बच्चन या शोचे किंग ठरले. त्यांनी आपल्या सहजतेने हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर नेला. हा शो लवकरच १ हजार भाग पूर्ण करणार आहे. या खास प्रसंगी आपला २१ वर्षांचा प्रवास पाहताना, बिग बींचेही डोळे पाणावले.

पाणावले बिग बींचे डोळे
‘कौन बनेगा करोडपती’चा १३वा सीझन हा प्रत्येक सीझन सारखा हिट ठरत आहे. या शोचे १ हजार भाग पूर्ण होणार असताना, अमिताभ बच्चनचे कुटुंब या शोमध्ये सामील होणार आहे. मुलगी श्वेता बच्चन नंदा आणि नात नव्या नवेली नंदा या शोमध्ये येणार आहेत. या शोचा प्रोमो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिग बीचे भावुक झालेले पाहायला मिळाले. (amitabh bachchan became emotional after seeing journey of 21 years of kbc said on 1000th episode game is not over yet)

‘संपूर्ण जग बदलल्यासारखं दिसत आहे’
हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये बिग बी, श्वेता आणि नव्याचे शोमध्ये स्वागत करताना दिसत आहेत. तेव्हा ते म्हणतात, “खास क्षण आहे, म्हणून विचार केला की यामध्ये कुटुंबाला सामील केले पाहिजे.” श्वेता बिग बींना म्हणते की, “बाबा मला विचारायचं आहे की, हा १००० वा एपिसोड आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?” यावर अमिताभ म्हणतात की, असं वाटतंय संपूर्ण जग बदललं आहे.” त्यानंतर शोचा २१ वर्षांचा प्रवास जगासमोर सादर करण्यात आला.

खेळ अजून संपला नाही
या व्हिडिओमध्ये पहिले करोडपती हर्षवर्धन नवाठे, तसेच पहिली महिला करोडपती आणि दुसरी ज्यूनियर करोडपती देखील दाखवल्या आहेत. ३ जुलै २००० पासून सुरू झालेला हा कार्यक्रम, आज प्रेक्षकांच्या जीवनाचा भाग बनला आहे. हा भावनिक व्हिडिओ पाहून अभिताभ बच्चन शेवटी म्हणतात, “चला खेळ पुढे नेऊया…. कारण खेळ अजून संपला नाही.” प्रेक्षकही हा खास एपिसोड पाहण्यासाठी बरेच उस्तुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा