Saturday, June 29, 2024

भाईजान नंतर बिग बीच्या जिवाला भीती, मुंबई पोलिसांनी दिली ‘एक्स’ सुरक्षा

बॉलिवूडचे बिग बी दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आज ते इंडस्ट्रीचे पावरफुल कलाकार म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, आज त्यांची हीच कारकिर्दी आणि प्रसिद्धी त्यांना धोक्याची ठरत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी आली होती, त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी ‘वाय’ सुरक्षा उपलब्ध करुन दिली होती. आता मात्र, बिग बीलाही ‘एक्स’ सुरक्षा दिली आहे.

आपल्या दमदार अभिनयाने यशाच्या शिखरावर पोहोचलेले अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही ‘एक्स’ प्रकारची सुरक्षा देण्यात येणार आहे सलमानच्या बातमीने पूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. आजच्या काळामध्ये जास्त लोकप्रियताच जिवावर बेतत आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांना जिवे मारण्याच्या बातम्या तुफान व्हायरल झाल्या होत्या. त्याशिवाय सलमानसारख्या स्टारलाही जिवे मारण्याची धमकी मिळली होती, त्यामुळे पोलिसांनी बिग बीलाही एक्स सुरक्षा जाहिर करण्यात आली आहे. कारण अमिताभ हे बॉलिवूड विश्वातील मोठी सेलिब्रिटी आहेत. यापूर्वी बीग बीला साधी सुरक्षा होती. मात्र, आता त्यांनाही अधिक सुरक्षा देण्यात आली आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारंना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत, त्यामुळे कुणाला सुरक्षा द्यायची आणि कोणाला नाही हा निर्णय इंटेलिजन्स डिपार्टमेंटकडून घेतला जाणार आहे. त्यांनी केलेल्या सर्वेनुसार त्या कालाकारची पूर्ण माहिती घेतली जाते, आणि त्या व्यक्तीच्या जिवाला किती धोका असण्याचा मुद्दा लक्षात घेऊन त्यांना सुरक्षा दिली जाते. बीग बी पूर्वी खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar)र याला देखिल एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याला तीन शिफ्टला पोलिस अधिकारी देण्यात आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐश्वर्याने मुलगी आराध्यासोबत सिद्धिविनायकाचे घेतले आशीर्वाद, फोटो शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
‘पॅंट फाटली अन्…’, हॅलोविन पार्टीत शक्तीमान झालेल्या सिद्धांत चतुर्वेदीचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा