Tuesday, April 16, 2024

ऐश्वर्याने मुलगी आराध्यासोबत सिद्धिविनायकाचे घेतले आशीर्वाद, फोटो शेअर करत चाहत्यांचे मानले आभार

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. ती जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त तिने हॉलिवूड चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. काही काळ बॉलिवूडपासून दूर गेलेल्या ऐश्वर्याने मनी रत्नम पीस 1 मधून दमदार पुनरागमन केलं. नुकताच अभिनेत्रीने 49 आपला वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. ऐश्वर्याने तिचा वाढदिवस तिच्या खास पद्धतीने साजरा केला. ऐश्वर्याने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी दोघींनी सिद्धिविनायक दर्शनासाठी हजेरी लावली.

ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर करत लिहिले, “धन्यवाद! तुमच्या अपार प्रेमासाठी, शुभेच्छा, आशीर्वाद आणि खूप सकारात्मकतेसाठी सर्वांचे खूप खूप आभार… गॉड ब्लेस”. बऱ्याच दिवसानानंतर ऐश्वर्या आपली मुलगी आराध्यसह दिसून आली. दोघी मायलेकींचा भक्तिमय अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

ऐश्वर्या राय बच्चन हिने आपल्या 49 व्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आराध्या बच्चनही होती. ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चनने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिषेकने ऐश्वर्याचा डेब्यू चित्रपट ‘इरुवर’मधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

अभिषेक बच्चनने वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
‘इरुवर’चे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले होते. ऐश्वर्या रायने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर 1997 मध्ये हा चित्रपट आला होता. ऐश्वर्याचा हा डेब्यू चित्रपट होता. पोस्ट शेअर करताना अभिषेक बच्चनने लिहिले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, पत्नी! प्रेम, प्रकाश, शांती आणि शाश्वत यश.”

‘पोनियिन सेल्वन: वन’मध्ये ऐश्वर्याचा अप्रतिम लूक
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ऐश्वर्या राय बच्चन शेवटची ‘पोनियिन सेलवन: वन’ मध्ये दिसली होती. मणिरत्नम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले आहे. यामध्ये ऐश्वर्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. या चित्रपटात विक्रम, कार्ती, प्रकाश राज, जयम रवी, त्रिशा कृष्णन आणि मोहन बाबू यांच्याही भूमिका आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पॅंट फाटली अन्…’, हॅलोविन पार्टीत शक्तीमान झालेल्या सिद्धांत चतुर्वेदीचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

‘अल्लाहा के बंदे हसते…’ गात ‘या’ गायकाने 35व्या वयातच घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा