Wednesday, July 3, 2024

‘महानायक’ अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केले डुप्लेक्स अपार्टमेंट; किंमत ऐकून फिरतील डोळे

बॉलिवूड मधील महानायक अशी ओळख असलेले अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण जगभरात चाहते पसरलेले आहेत. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. ते त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी एक नवीन घर खरेदी केले आहे. त्यांनी मुंबईमधील अंधेरी येथे एक अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट अटलांटिसमध्ये हे घर खरेदी केले आहे.

त्यांनी हा डुप्लेक्स अपार्टमेंट 31 कोटी रुपयांत खरेदी केला आहे. त्यांनी मागच्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये हे घर खरेदी केले आहे. या वर्षी 2021 मध्ये त्याचे रजिस्ट्रेशन झाले आहे. अमिताभ बच्चन यांनी या घरासाठी 62 लाख रुपयांची स्टँप ड्युटीही भरली आहे. त्यांचे हे अपार्टमेंट 5184 स्क्वेअर फूट एवढे आहे.

इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांचे हे अपार्टमेंट अटलांटिसवरील 26 आणि 27 व्या मजल्यावर आहे. त्यांचा हा प्रोजेक्ट रियल्टी क्रिस्टल प्राईड डेव्हलपर द्वारे विकसित केला जात आहे. त्यांना या घरासोबत 6 गाड्यांची पार्किंग मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारने 26 ऑगस्ट, 2020 रोजी या घरावर स्टॅम्प ड्यूटी 5 टक्क्यांवरून 2 टक्के केली होती. यामुळे रिअल इस्टेटला खूप सपोर्ट मिळेल. सरकारने ही सूट 31 डिसेंबर, 2020 पर्यंत दिली होती. याचा फायदा अमिताभ बच्चन यांना झाला आहे.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेकांनी या प्रोजेक्टमध्ये घर खरेदी केले आहे. यामध्ये अभिनेत्री सनी लिओनी, दिग्दर्शक आनंद एल.राय. यांनी घर खरेदी केले आहे. सनी लिओनीने या प्रोजेक्टमधून 16 कोटी रुपयाचे 4,365 स्क्वेअर फूट असलेले एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. आनंद एल.राय. यांनी 25 कोटी रुपयाचे एक डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे.

याव्यतिरिक्त त्यांच्याकडे अनेक बंगले आहेत. त्यात जलसा, जनक, वत्स या बंगल्यांचा समावेश आहे. त्यातील एक त्यांचा जनक बंगला. हाच त्यांचे ऑफिस आहे. हा बंगला त्यांनी सन २००४ मध्ये ५० कोटी रुपयांमध्ये विकत घेतला होता. ते नेहमी आपला जावई अगस्त्य नंदासोबत इथे दिसतात. त्यांचा प्रतीक्षा बंगला हा जुहूमध्ये आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचे आई- वडील राहायचे. बच्चन कुटुंबाने हे घर सन १९७६ मध्ये विकत घेतले होते. याच बंगल्यात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे सन २००७ मध्ये लग्न झाले होते.

त्यांच्याकडील बंगल्यांपैकी आणखी एक बंगला म्हणजे वत्स. हादेखील जुहूमध्ये आहे. हा बंगला बच्चन यांनी सिटी बँक ऑफ इंडियाला भाड्याने दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा