बॉलिवूडच्या इतिहासातील सरावात जास्त मनोरंजक असणाऱ्या चित्रपटांपैकी एक असलेला सिनेमा म्हणजे बॉम्बे टू गोवा. या सिनेमाने लोकप्रियतेचे आणि कमाईचे अक्षरशः शिखर गाठले. अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, अरुणा ईराणी, मेहमूद यांच्या भूमिकांनी नटलेल्या या सिनेमाला आजही लोकं विसरलेली नाही. आज (३ मार्च) या सिनेमाला प्रदर्शित होऊन तब्बल ५० वर्ष पूर्ण होत आहे. अमिताभ बच्चन यांच्या करिअरच्या अगदीच सुरुवातीच्या दिवसांमधील असलेल्या या सिनेमाने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. आज अमिताभ बच्चन यांना महानायक ही ओळख मिळाली असली तरी ५० वर्षांपूर्वी अमिताभ अगदीच नवीन होते. अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपट कारकिर्दीमध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक असलेल्या मेहमूद यांचा मोलाचा वाटा आहे. आज या सिनेमाबद्दलची एक आठवण एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बॉम्बे टू गोवा हा सिनेमा ३ मार्च १९७२ साली प्रदर्शित झाला होता. मेहमूद यांनी या सिनेमात अभिनयासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. त्यांनी या सिनेमातून प्रेक्षकांना तुफान हसवले. जेव्हा हा सिनेमा आला तेव्हा नाही डिजिटल तंत्रज्ञान होते नाही तांत्रिक क्रांती झाली होती, तरी देखील हा सिनेमा असतीशय उत्तम पद्धतीने बनवला गेला. आजही या सिनेमाला प्रत्येक पिढीतील व्यक्ती बघू शकते आणि एन्जॉय करू शकते. हा सिनेमा जेवढा हिट झाला तेवढेच सिनेमातील सीन, संवाद आणि गाणी गाजली. ‘देखा ना हाय रे’ हे गाणे तर तुफान गाजले. याच गाण्याशी संबंधित एक किस्सा बसमध्ये घडला होता.
या सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या मेहमूद यांनी स्वतः एका कार्यक्रमादरम्यान हा किस्सा सर्वांना सांगितला होता. या कार्यक्रमात किस्सा सांगताना ते म्हणाले की, “बॉम्बे टू गोवा सिनेमाच्या शूटिंगसाठी आम्ही आणि आमची संपूर्ण कास्ट, टीम एका बसमध्ये बसलो आणि गोव्याच्या दिशेने जाऊ लागलो. शूटिंग करत असताना एक दिवस आम्ही ‘देखा ना हाय रे’ या गाण्याची शूटिंग सुरु केली. या गाण्याची शूटिंग आम्ही चेन्नईमध्ये बसमध्ये शूट करणार होतो. ज्या दिवशी या गाण्याचे शूटिंग होणार होते त्या दिवशी मी सेटवर जेव्हा गेलो तेव्हा अमिताभ बच्चन यांना ताप आला होता. आणि ते रूममध्ये आराम करत होते. मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते रडत होते. ते म्हणाले, “माझ्याकडून डान्स नाही होणार. मास्टर मला सांगत आहे आणि माझ्याकडून ते होत नाही. मी नाही करू शकणार भाईजान.”
मेहमूद यांनी पुढे सांगितले की, “जो व्यक्ती चालू शकतो तो डान्स देखील करू शकतो. आज आराम करा उद्या या, बघ इंशाअल्लाह सर्व काही चांगले होईल. दुसऱ्या दिवशी मी मास्तरजींना सांगितले बघ मला शॉट घ्यायचा आहे. जरी शॉट खराब आला तरी बसमध्ये बसलेल्या लोकांकडून जोरजोरात टाळ्या वाजवून घे, मग पुढे जा. दुसरा शो घे रिटेक घेऊ नको. कारण अभिनेत्याची खुराक असते, त्याची स्तुती.”
पुढे मेहमूद म्हणाले, “मी शूटिंगच्या आधी सर्वांना समजून सांगितले होते. जेव्हा ते त्यांच्या रूममधून बाहेर आले तेव्हा मी कुराण शरीफ म्हणून त्यांच्यावर फुंकर देखील मारली. मग त्यांनी शॉट दिला आणि खूपच खराब शॉट दिला. गाण्याच्या शब्दांसोबत स्टेप्स अजिबात मॅच होत नव्हत्या. मात्र तरीही लोकांनी टाळ्या मारल्या. गाणे जसे पुढे सरकले तसे अमितजी एकदम मूडमध्ये आले. आणि त्यांनी एकदम झक्कास डान्स केला.” या गाण्याला किशोर कुमार यांनी आवाज दिला होता तर आर डी बर्मन यांनी संगीत दिले होते.”
हेही वाचा –