Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचे कौतुक करताना केलेल्या ट्विटमुळे महानायक अमिताभ बच्चन ट्रोल

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचे कौतुक करताना केलेल्या ट्विटमुळे महानायक अमिताभ बच्चन ट्रोल

आता माणूस म्हटला तर चुका होणारच. याला कलाकार देखील अपवाद नाही. कलाकारांकडून देखील कधी बोलताना, लिहिताना चुका होतातच. मात्र आता कलाकारांकडून होणाऱ्या चुका ह्या सोशल मीडियामुळे लगेच लक्षात येतात आणि ज्यांनी ह्या चुका केल्या आहेत त्यांना त्यांच्या चुकीवरून ट्रोल देखील केले जाते. सोशल मीडियावरील या ट्रोलिंगला जवळपास सर्वच कलाकार बळी पडतात. मग त्यात लहान मोठे अशा सर्वच कलाकारांचा समावेश असतो. अशा या ट्रोलिंगला महानायक अमिताभ बच्चन देखील सामोरे जात आहे.

टोकियोमध्ये नुकत्याच ऑलीम्पिक स्पर्धा संपन्न झाल्या, आणि भारतासाठी ह्या स्पर्धा खूपच महत्वाच्या आणि इतिहास रचणाऱ्या ठरल्या. या स्पर्धांमध्ये भारताचा ‘शेवटचा दिस गोड’ झाला. आणि भारताला भालाफेक या विभागात नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवून दिले. त्याच्या या आभाळाएवढ्या कामगिरीसाठी त्याच्यावर आम पासून खास अशा संपूर्ण देशवासीयांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात महानायक अमिताभ बच्चन देखील मागे नव्हते. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून नीरजचे कौतुक करताना एक खास ट्वीट पोस्ट केले. (Amitabh Bachchan Gets Trolled)

या ट्विटमध्ये त्यांनी एक ऍनिमेटेड व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, “एका छातीने, १०३ कोटी जनतेच्या छात्या अभिमानाने मोठ्या केल्या आणि भारताच्या ऑलीम्पिक संघाने जगभरात देशाचा झेंडा गाडला आहे.”

या ट्विटमध्ये अमिताभ यांनी आपल्या देशाची लोकसंख्या चुकीची टाकली आणि ट्रोलर्सला आयते कोलीत हातात मिळाले. १३० कोटी जनतेऐवजी त्यांनी १०३ कोटी जनता लिहिल्याने त्यांना ट्रोल केले जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना खरी लोकसंख्या सांगितली जात आहे. ट्रोलिंग वाढल्यानंतर अमिताभ यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी त्यांची चूक स्वीकारत एक नवीन ट्वीट केले, त्यात त्यांनी ‘चूक दुरूस्त १३० कोटी’ असे लिहिले आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ते लवकरच चेहरे, झुंड, मेडे या चित्रपटांमध्ये दिसणार असून, सोबतच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात देखील ते झळकणार आहेंत. शिवाय सध्या ते त्यांच्या ‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग करत असून, या सिनेमात त्यांच्यासोबत रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता दिसणार आहे. ते दीपिकासोबत ‘द इंटर्न’ या इंग्लिश सिनेमाच्या हिंदी रीमेकमध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अरुणिता कांजिलालसोबतच्या आपल्या नात्यावर पवनदीप राजनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आम्ही एकमेकांच्या खूपच…’

सुपर्ब! मराठमोळ्या अनुजा साठेचा वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

‘आता तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार नाही, तर कायमचा थांबणार’, ‘रात्रीस खेळ चाले ३’ चा प्रोमो प्रदर्शित

 

हे देखील वाचा