Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड मीझान जाफरी नव्हे, तर ‘या’ अभिनेत्याला डेट करतेय बिग बींची लाडकी नात नव्या नवेली नंदा

मीझान जाफरी नव्हे, तर ‘या’ अभिनेत्याला डेट करतेय बिग बींची लाडकी नात नव्या नवेली नंदा

मनोरंजनाच्या दुनियेत, प्रेक्षकांना केवळ चित्रपटच्या कथाच पाहायला आवडतात असे नाही, तर पडद्यामागील कथा आणि किस्से देखील चाहत्यांना अधिक रंजक वाटतात. कोणत्या कलाकाराच्या आयुष्यात काय चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. यामध्ये अनेक स्टारकिड्सचा समावेश आहे, ज्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना आवडते. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा चित्रपटात काम करत नाही, पण तरीही सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे. ती नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

सिद्धांतला डेट करतेय नव्या?
नव्याने आधीच स्पष्ट केले आहे की, ती चित्रपटात काम करणार नाही. पण तिचे सुंदर फोटो पाहून सर्वांचे मन हरखून जाते. नव्याची लव्ह लाईफही नेहमीच चर्चेत असते. अगोदर तिचे नाव जावेद जाफरी यांचा मुलगा मीझान जाफरी याच्याशी जोडले गेले होते. पण आता बातमी येत आहे की, मीझानसाठी नव्हे तर नव्याचे हृदय सिद्धांत चतुर्वेदीसाठी धडधडत आहे. (amitabh bachchan granddaughter navya naveli rumour to be dating siddhant chaturvedi not meezan jafri)

माध्यमातील वृत्तानुसार, नव्या ‘गली बॉय’ फेम एमसी शेर म्हणजेच सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत आहे. नव्या आणि सिद्धांत एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असून दोघेही त्यांच्या नात्याबाबत खूप गंभीर असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, या प्रकरणी नव्या आणि सिद्धांत या दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

जावेद जाफरी यांचा मुलगा मीझान जाफरी याच्याशी नव्याचे नाव नेहमीच जोडले गेले आहे. मात्र मीझानने नेहमी सांगितले की, नव्या केवळ त्याची चांगली मैत्रीण आहे. जेव्हा जेव्हा नव्या फोटो पोस्ट करते, तेव्हा मीझान त्यावर लक्षवेधी कमेंट करतो. अशा परिस्थितीत, युजर्सला वाटायचे की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. कारण त्यांना बर्‍याच वेळा एकत्र फिरतानाही पाहिले गेले होते.

मात्र, आता समोर येत असलेल्या बातम्यांवरून नव्याला मीझान नाही तर सिद्धांत आवडत असल्याचे दिसून येते. मीझानने अनेक मुलाखतींमध्ये असेही सांगितले की, नव्या त्याची चांगली मैत्रीण आहे आणि जेव्हा त्यांच्या अफेअरच्या खोट्या बातम्या समोर येतात, तेव्हा त्याला ते अजिबात आवडत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता

हे देखील वाचा