Friday, December 1, 2023

फ्लिपकार्टच्या जाहिरातीमुळे अमिताभ बच्चन वादाच्या भोवऱ्यात; व्यापारी संघटनेनी केली ‘ही’ मागणी

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलच्या जाहिरातीमुळे व्यापार्‍यांची नाराजी निर्माण झाली आहे. या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात की बिग बिलियन डे सेलमध्ये फोन ज्या किमतीत मिळतील, त्या किंमतीत ते कोणत्याच मोबाईल स्टोअरमध्ये ऑफलाइन मिळणार नाही. यावरून व्यापार्‍यांनी ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे.

बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) सणासुदीच्या तोंडावर फ्लिकपार्ट या ऑनलाइन रिटेल पोर्टलसाठी केलेल्या जाहिरातीमुळे वादात सापडले असून व्यापारी संघटनेने त्यांच्या जाहिरातीवर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. या जाहिरातीबाबत बिग बी आणि फ्लिपकार्टवर जोरदार टीका करणाऱ्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) ग्राहक मंत्रालयाच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (CCPA) अध्यक्ष निधी खरे यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे.

व्यापार व उद्योग महासंघ (सीएआयटी) ने या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ही जाहिरात दिशाभूल करणारी आहे. यामुळे देशातील छोट्या विक्रेत्यांविरुद्ध आणि दुकानदारांविरूद्ध अन्याय होत आहे.

सीएआयटीने तक्रारीत मागणी केली आहे की, फ्लिपकार्टला जाहिरात मागे घ्यावी आणि अमिताभ बच्चन यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा. दिशाभूल करणारी जाहिरात हा ग्राहक संरक्षण कायद्याचा भंग आहे. या कायद्यानुसार, दिशाभूल करणारी जाहिरात करणाऱ्यांवर दंड ठोठावला जाऊ शकतो. या जाहिरातीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी कॅटने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे केली आहे. जेणेकरून देशातील ऑफलाइन किरकोळ व्यापाऱ्यांना जाहिरातीमुळे होणाऱ्या तोट्यापासून वाचवता येईल.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने सीसीपीएला फ्लिपकार्ट आणि अमिताभ बच्चन यांना दंड ठोठावण्याची विनंती केली आहे. अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीमुळे संपूर्ण व्यापारी समुदाय त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. या जाहिरातीवरून आता काय होईल, हे पाहणे औत्सुक्यास्पद ठरणार आहे. (Amitabh Bachchan in controversy due to Flipkart advertisement)

आधिक वाचा-
गिरीजा ओकने शाहरूख खान विषयी केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘भर पार्टीत त्याने माझा हात धरला अन्…’
अर्रर्र! जिनिलीयाला पाहताच आमिर खानचा गेला तोल अन्….; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा