Monday, October 2, 2023

‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अमिताभ बच्चन ‘या’ डायरेक्टरचे गुणगान गाताना दिसणार, वाचा सविस्तर

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकांच्या लाडक्या ‘कौन बनेगा करोडपती‘ सीझन 15मध्ये ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या आगामी चित्रपटाचे कलाकार विकी कौशल आणि मानुषी चिल्लर यांचे स्वागत करण्यात येणार आहे. हॉटसीटवर विराजमान झालेले विकी आणि मानुषी हुशारीने हा खेळ खेळतानाच मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याशी मनमोकळ्या गप्पा देखील मारताना दिसतील.

या एपिसोडमधला एक हायलाईट म्हणजे बिग बी (Amitabh Bachchan) आणि विकी कौशल यांच्यातील संभाषण, ज्यात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. बिग बी यांनी विकी कौशलचे वडील सुप्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांच्या आठवणी सांगितल्या. सेटवरील सूत्रांनी सांगितले की, श्री. बच्चन संभाषणाची सुरुवात करताना श्री. श्याम कौशल यांचे गुणगान करताना दिसतील आणि आपले काम करत असताना ते चित्रपटाच्या सेटवरील लोकांच्या सुरक्षेची किती काळजी घेत असत, याबद्दल सांगतील.

या प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टरबरोबर केलेल्या कामाचा आपला विस्तृत अनुभव बिग बी प्रेक्षकांशी शेअर करतील. ते सांगतील की कसे श्याम जी हे कठोर परिश्रम आणि चिकाटीचे जणू प्रतीकच होते. सेटवर आपल्या कलाकारांची ते विशेष काळजी घेत. जेव्हा एखाद्या दृश्यात इजा होण्याची शक्यता दिसून येई, तेव्हा ते अभिनेत्याला आधीच त्याची पूर्ण जाणीव देत आणि अभिनेत्याच्या जागी कुशल बॉडी डबल वापरण्याचा सल्ला देत असत. सगळ्या कलाकारांची ते ज्या प्रकारे काळजी घेत असत, त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेत असत, त्याबद्दल बिग बी कृतज्ञता व्यक्त करताना दिसतील.

या भागात आमंत्रित कलाकारांनी जिंकलेली रक्कम मानवलोक ऑर्गनाईझेशनला दान करण्यात येईल. ही संस्था सामाजिक-आर्थिक मदतीद्वारे मागासलेल्या आणि ग्रामीण समुदायाच्या उन्नतीसाठी काम करते. या शुक्रवारी अवश्य बघा, ‘कौन बनेगा करोडपती सीझन 15’ रात्री 9:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर. (On the stage of Kaun Banega Crorepati Amitabh Bachchan will be seen singing the praises of famous action director Shyam Kaushal Vicky Kaushal father)

अधिक वाचा-
अर्जुन कपूरवर कोसळला दु:खाचा डोंंगर; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘तुझी नेहमी आठवण येत राहील’
‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अमिताभ बच्चन ‘या’ डायरेक्टरचे गुणगान गाताना दिसणार, वाचा सविस्तर

हे देखील वाचा