Tuesday, July 9, 2024

‘हळू हळू सर्वच सोडून चालले’, म्हणत अमिताभ यांनी बप्पी लहिरी यांना वाहिली श्रद्धांजली

भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांचे १६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहिरी यांच्या निधनामुळे बॉलिवूड दुःखात बुडाले आहे. कलाकारांनी सोशल मीडियावर बप्पी लहिरी यांच्या आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूडचे शेहंशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बप्पी लहिरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले, “गायक संगीतकार बप्पी लहिरी यांनी माझ्या अनेक चित्रपटांना संगीत दिले. अनेक अविस्मरणीय गाणी मला दिली. त्यांना त्यांच्या गाण्यांसाठी अनेक दशकांनंतरही लक्षात ठेवले जाईल.”

पुढे अमिताभ यांनी लिहिले, “बप्पी लहिरी यांच्या निधनामुळे स्तब्ध आणि हैराण झालो आहे. बप्पी लहिरी…एक अद्भुत संगीत दिग्दर्शक यांचे निधन हे दुःखद आणि हैराण करणारे आहे. एवढ्या लवकर लवकर लोकांचे निधन होण्याच्या घटनांमुळे धक्क्यात आहे. माझ्या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेल्या गाण्यांना पुढील अनेक वर्ष लक्षात राहतील. या गाण्यांना आजची पिढी देखील आनंदाने ऐकते आणि गाते. त्यांच्यामध्ये यशाचा उत्तम सेन्स होता.” पुढे त्यांनी बप्पी दा यांच्यासोबतच्या लंडन ते मुंबई प्रवासाला उजाळा दिला आहे. या प्रवासात त्यांनी अमिताभ यांना सांगितले होते की, “तुमचे सिनेमे खूप हिट होत आहे. जे गाणे मी दिले आहे त्याला युगानुयुगांपर्यंत लक्षात ठेवले जाईल. ते खरंच बरोबर होते. त्यांच्या घरी होणारे सराव आणि अनुभव आदी सर्वच गोष्टी नवनवीन शिकवणी देणाऱ्या होत्या. हळूहळू सर्वच सोडून चालले आहेत.”

बप्पी लहिरी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार, अजय देवगन, काजोल यांच्यासह अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा