Tuesday, May 21, 2024

अमिताभ बच्चन यांनी नागरिक स्वातंत्र्यावर केले मोठे वक्तव्य म्हणाले, ‘आजही अभिव्यक्ती…’

नुकतंच अभिनयक्षेत्रामध्ये ‘कोलकत्ता फिल्म फेस्टिवल‘ (दि, 15 डिसेंबर) रोजी पार पडला असून यामध्ये जगभरातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यापैकीच बॉलिवूडमधील बीग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी देखिल फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. त्यांनी फेस्टिवच्या मंचावर ‘नागरिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर अभिनेत्याने त्यांचे मत व्यक्त केले.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी गुरुवारी पार पडलेल्या कोलकत्ता फिल्म फेस्टिवल (Kolkata International Film Festival) मध्ये इतर कलाकारांसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी त्यावेळी त्यांनी फेस्टिवलच्या मंचावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बेधडक आपले वैयक्तीक मत व्यक्त केले आहे. अमिताभजी सतत देशात होणाऱ्या घडामोंडींवर आणि समाजात घडणाऱ्या घटनांवर आपली बाजू मांडत असतात.

अमिताभल यांनी कोलकत्ता फिल्म फेस्टिवलच्या मंचावर मत व्यक्त करत सांगितले की, “जेव्हा चित्रपटांचा विषय येतो तेव्हा आजही अभिव्यक्ती स्वातंत्रायवर प्रश्न निर्माण केले जोतात. मला विश्वास आहे की, मंचावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला देखिल मान्य असेलच की, अजूनही नागरिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न निर्माण केले जातात.”

कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अमिताभजी शिवाय अभिनेता शाहरुख खान (Shaharukh Khan), राणी मुखर्जी (Rani Mukharji) सारखे अनेक कलाकारांची नावे यादीमध्ये आहेत. शाहरुखने पठान चित्रपटाच्या बॉयकॉट ट्रेंडवर मौन तोडत सांगितले की, “सोशल मीडियावर काही लोक नकारत्मक गोष्टी पसरवत आहेत. चित्रपट समाज बदलण्याचे साधन आहे. सोशल मीडिया सहसा एका विशिष्ट संकुचित मानसिकतेमुळे चालतो, ज्यामुळे लोकांच्या स्वभावाची पातळी कमी होते. मी कुठेतरी वाचलं होतं की, नकारात्मकतेमुळे सोशल मीडियाचा खप वाढतो. असे प्रयोग एका विश्वासाला बळकट करतात, जे पुढे सोशल मीडियाला फूट पाडणारे आणि विध्वंसक बनवतात.”

अभिनेत्याने पुढे सांगितले की, “जग आता पूर्व परिस्थितीसारखं झालं आहे. आपण सगळे खुश आहोत, मी सगळ्यात जास्त खुश आहे आणि ही गोष्ट सांगण्यासाठी मला आपत्ती नाही. जग काही पण करो, तुम्ही लोक आणि मी आणि जेवढेही सकारात्मक लोक आहेत. ते अजून जिवंत आहेत.

अशा खनकदार शब्दात शाहरुखने ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना प्रतिउत्तर दिलं आहे. त्याशिवाय शाहरुखने केलेल्या भाषणाची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या अशा वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘पठाण’ चित्रपटाचा पेटलाय वाद! इंदोरमध्ये जाळपोळ, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

‘अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए….’ डायलॉग म्हणत शाहरुखने ‘पठाण’ चित्रपटाच्या बॉयकॉट ट्रेंडवर तोडले मौन

हे देखील वाचा