बिग बींनी ‘कमला पसंद’ला पाठवली कायदेशीर नोटीस, पान मसाला कंपनीला त्यांच्या जाहिराती थांबवण्याची केली मागणी


महानायक अमिताभ बच्चन यांनी ११ ऑक्टोबर, म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त पान मसाला कंपनी ‘कमला पसंद’सोबतचा करार रद्द केला. दरम्यान, आता अमिताभ बच्चन यांनी पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून ते ज्या पान मसालामध्ये आहेत त्या जाहिराती तात्काळ थांबवाव्यात, म्हणजेच त्यांचे प्रक्षेपण थांबवावे, अशी मागणी करत असल्याचे समोर आले आहे.

अमिताभ बच्चन यांनी कमला पसंद कंपनीसोबतचा त्यांचा करार संपुष्टात आणताना सांगितले की, हे सरोगेट जाहिरातींच्या अंतर्गत येत असल्याची त्यांना माहिती नव्हती. यानंतर अमिताभ यांनी ऐतिहासिक पाऊल उचलत पान मसाला कंपनीला त्यांच्या जाहिराती बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पान मसाला ब्रँड ‘कमला पसंद’ अजूनही अमिताभ बच्चन असलेल्या जाहिरातींचे प्रसारण करत आहे. (amitabh bachchan sends legal notice to pan masala company kamala pasand to stop broadcasting his advertisement)

का केला होता बिग बींनी करार रद्द
अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयातून असे समजले आहे की, कमला पसंद यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यात अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातींचे प्रसारण तात्काळ थांबवण्यास सांगितले आहे. कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणताना अमिताभ बच्चन यांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, कमला पसंद जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला आणि गेल्या आठवड्यात स्वतःला त्यातून बाहेर काढले.

निवेदनात पुढे म्हटले होते की, जेव्हा अमिताभ या ब्रँडमध्ये सामील झाले तेव्हा त्यांना हे माहित नव्हते की ते सरोगेट जाहिरातींच्या अंतर्गत आले आहे. त्यामुळे त्यांनी ब्रँडसोबतचा करार संपुष्टात आणला आहे. या शेवटी, त्यांनी प्रमोशनसाठी मिळालेली रक्कम देखील परत केली आहे.

महत्वाचे म्हणजे, अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे खूप दिवसांपासून ट्रोल केले जात होते. त्यानंतरच त्यांनी हे मोठे पाऊल उचलले. पान मसाला ब्रँडसोबतचा करार संपल्यावरही ते ट्रोल झाले होता. यावर आपली भूमिका मांडताना अमिताभ म्हणाले होते की, हा मनोरंजन व्यवसायाचा भाग आहे, ज्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर

-जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा


Latest Post

error: Content is protected !!