Thursday, July 18, 2024

दिवसेंदिवसच अधिकच स्टायलिश होत चाल्लेत बिग बी, लेटेस्ट फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

आजही ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा जबरदस्त अभिनय आणि स्वॅग पाहून चाहत्यांना नेहमीच आश्चर्य वाटते. वयाच्या ७९व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि कामाची आवड हे दर्शवते की, वय हा फक्त एक आकडा आहे. बिग बी आजही आपल्या अभिनयाने करोडो लोकांच्या मनावर राज्य करतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सतत जोडलेले असतात. आता त्यांच्या लेटेस्ट पोस्टमध्ये पुन्हा एकदा अमिताभ बच्चन अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत. यावेळी ते हातात कॅमेरा धरून एखाद्या प्रोफेशनल कॅमेरामॅनप्रमाणे पोझ देताना दिसत आहे.

ऑल ब्लॅक लूकमध्ये डॅशिंग दिसले बिग बी!
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून शेअर केलेल्या फोटोमध्ये ते ब्लॅक लूकमध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे. वर राखाडी शर्ट आणि काळ्या रंगाचे जॅकेट परिधान करून, स्टायलिश काळ्या पँटसोबत मॅच होणारे शूज घालून त्यांनी हा लुक पूर्ण केला आहे. अभिनेते त्यांच्या एका हातात कॅमेरा धरून स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहतेही जोरदार कमेंट करत आहेत. (amitabh bachchan shared a new stylish picture with the camera)

दिले खास कॅप्शन
एक काळ असा होता, जेव्हा फोटोसाठी कॅमेरा हा एकच पर्याय असायचा. पण जसजसा मोबाईल येऊ लागला तसतसा त्यांचा वापर नगण्य झाला. आजच्या काळात लोकांना उत्तम कॅमेरा क्वालिटीचा कॅमेरा मोबाईलमध्येच मिळतो. अशा परिस्थितीत आजकाल कॅमेरा फक्त प्रोफेशनलच्या हातात दिसतो आणि हे लक्षात घेऊन अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टला कॅप्शन दिले आहे. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, “हातात कॅमेरा निरुपयोगी.. दुसऱ्याची सोय.. जगात त्यापैकी ७ अब्ज आणि भारतात एक अब्जाहून अधिक-मोबाईल कॅमेरा!!!”

चाहत्यांनी केले कौतुक
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट आणि त्यांच्या पोस्ट या दोन्हींसाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे. मग ते ८० ते ९० च्या दशकातील लोक असोत किंवा तरुण वर्ग सगळेच बिग-बीला पसंत करतात. अवघ्या काही तासांतच त्यांच्या पोस्टवर ६७ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत आणि सतत कमेंटही येत आहेत. अमिताभ यांचा हा लूक पाहून एका चाहत्याने लिहिले, “सो हॉट सो हॉट” तर दुसऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले “लुकिंग हॅण्डसम सर.”

बिग बींचे वर्कफ्रंट
जर आपण त्यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो, तर अलीकडेच बिग बी ‘झुंड’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले आणि सध्या ते त्यांच्या आगामी ‘गुड बाय’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ज्यामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. याशिवाय लवकरच अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय ‘शो कौन बनेगा करोडपती’ही सुरू होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा