×

प्रजासत्ताक दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांच्या गर्दीसह त्यांचा तिरंग्याच्या रंगात रंगलेल्या दाढीचा फोटो केला शेअर

देशात बुधवारी (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. प्रत्येकजण आपल्या मित्रांना कुटुंबीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहे. सगळीकडेच देशभक्तीपर गीत ऐकू येत आहेत. देशाच्या राष्ट्रध्वजाला सलामी देत अनेकजण आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. याच क्रमाने बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ ( Amitabh Bachchan) हे अशा कलाकारांपैकी एक आहेत ज्यांना या वयात त्यांच्या कामासह सोशल मीडियाचा आनंद घेणे आवडते. चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी त्यांचा एक मजेदार फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांची दाढी तिरंग्याच्या रंगात रंगलेली दिसत आहे.

प्रत्येक प्रसंगी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा द्यायला न चुकणारे अमिताभ यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, “प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.” अमिताभ यांच्या या स्टाईलवर काही चाहते मस्तीच्या मूडमध्येही दिसत आहेत. मात्र, दाढीच्या जागी तिरंग्याचा रंग पाहून काहीजण नाराजही होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

यासह, अमिताभ यांनी दर रविवारी त्यांच्या घरी होणाऱ्या गर्दीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जेव्हा ते लॉकडाऊनच्या आधी दर वीकेंडला त्यांना अशा प्रकारे भेटायचे. घराच्या गेटच्या बाहेर चाहते दिसत आहेत आणि आतमध्ये अमिताभ एका व्यासपीठावर उभे असलेले दिसत आहेत जेणेकरून चाहत्यांना त्यांना चांगले पाहता येईल.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ते त्यांचा पुढील चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. ज्यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मोनी रॉय त्यांच्यासोबत दिसणार आहेत. याशिवाय अमिताभ यांच्याकडे ‘रनवे ३४’ आणि ‘झुंड’ हे चित्रपटही आहेत.

हेही वाचा :

सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे बोल्ड फोटो समोर, चाहते म्हणतायेत, ‘इथे आग लागली ना राव’

मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलेल्या अनुष्का शर्माचे चमकले नशीब, ‘अशी’ मिळाली किंग खानसोबत काम करण्याची संधी

‘आमच्या पवानगीशिवाय…’ सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्याचा चाहत्याने दिले ‘हे’ अनोखे आवाहन

 

Latest Post