अनुष्का शर्माने (Anushka sharma) स्वतःच्या अभिनय कौशल्यावर, आत्मविश्वासावर स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. मनोरंजन क्षेत्रातशी तिच्या परिवाराचा काहीही संबंध नसताना तिने स्वबळावर स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनय कौशल्याने तिने लोकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनुष्का शर्मा बंगळुरू येथे राहणारी आहे. २००७ मध्ये तिच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळणारी घटना घडली. एका शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलेली अनुष्काच्या बाबतीत तिच्या आयुष्याला बदलून टाकणारी अनोखी घटना घडली.
कोणाच्या नशिबात काय लिहिले असेल, कुणाचं नशीब कधी बदलेल सांगता येत नाही. जर एखादी गोष्ट नशिबात लिहिलेली असेल, तर ती गोष्ट तुम्हाला मिळणारच. अनुष्का शर्माच्या बाबतीतही एक अशीच घटना घडली या घटनेवरून नशीबावर ती नेहमीच भरोसा ठेवाल. नक्की काय आहे घटना ही आपण जाणून घेऊया. अनुष्का शर्माच्या आयुष्यात ही घटना घडली आणि ती थेट बॉलिवूडमध्ये आली.
मॉलमध्ये शॉपिंग करताना मिळाली होती ऑफर
मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलेल्या अनुष्काला देखील माहित नव्हतं की, असं काहीतरी घडेल. ज्या मॉलमध्ये अनुष्का शर्मा शॉपिंग करायला गेलेली होती. त्याचं मॉलमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर वेंडेल रॉड्रिक्स तेथे होता. जेव्हा त्याची नजर अनुष्का शर्मावर गेली, तेव्हा त्याने तिला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला दिला. गप्पा गोष्टी करत असताना वेंडलने तिला लॅक्मे फॅशन वाॅक साठी तयारही केलं. नेतो रॅम्पवॉक केला आणि मनोरंजन क्षेत्राचा दरवाजा तिला खुला झाला. परंतु नशिबाचे दरवाजे अजून उघडायचे होते.
मॉडेलिंगनंतर शर्मा चित्रपटांमध्ये ऑडिशन देत होती. ती मुंबईमध्ये ‘रबने बना दी जोडी’ या सिनेमासाठी ऑडिशन देण्यासाठी आली होती. सुरुवातीला आदित्य चोप्राने तिला नकार दिला होता, परंतु काही कारणामुळे तिला चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून घेण्यात आल. परंतु आदित्य चोप्राने तिला तसं सांगितलं होतं की, “तू एवढी सुंदर दिसत नाहीस तुला स्वतः वर खूप मेहनत घ्यावी लागेल.” परंतु नशिबात लिहिलेलं होतं ते तिला मिळालं आणि तिने त्या संधीचं सोनं केलं. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. त्या दोघांची केमेस्ट्री सगळ्यांना खूप आवडली होती. या चित्रपटानंतर तिला यश मिळाले.
हेही वाचा :
‘आमच्या पवानगीशिवाय…’ सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्याचा चाहत्याने दिले ‘हे’ अनोखे आवाहन
ऋतिक रोशन-यामी गौतमच्या ‘काबिल’मुळे रडली होती प्रिती झिंटा, चीनमध्येही होती चर्चा
‘आय लव्ह माय इंडिया,’ म्हणत बिग बॉस फेम सोनाली पाटीलने दिल्या प्रजास्ताक दिनाच्या शुभेच्छा