×

सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे बोल्ड फोटो समोर, चाहते म्हणतायेत, ‘इथे आग लागली ना राव’

स्टायलिश, आयकॉनिक, बोल्ड, सुंदर अशी अनेक विशेषणं घेतली की, समोर येते ते सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे देखणे रूप. आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी ती सोडत नाही. अशातच तिचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

सोनालीने (sonalee kulkarni) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे. या फोटोमध्ये तिच्या अगदी मादक अदा पाहायला मिळत आहे. साडीच्या पदरासोबत ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “झुळूक वाऱ्याची आली रे, लेऊन कोवळी सोन फुले. साजन स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुले.” तिचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होताना दिसत आहेत. तिचे अनेक चाहते या पोस्टवर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “डोंबिवलीत आग लागली रे या फोटोमुळे कोणीतरी ॲम्बुलन्स बोलवा.” तसेच आणखी एकाने कमेंट केली आहे की, “थंडीमध्ये आग लागली.” तसेच बाकी चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत मेहनती अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे नाव कमावले आहे. २०२१ मध्ये तर तिच्या ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ या चित्रपटांनी धमाल केली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच ती सध्या तिच्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्याला सोनाली विविध नवीन भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे यात काही शंका नाही.

हेही वाचा :

Latest Post