Monday, July 1, 2024

नेटकरी तर नेटकरी, आता बिग बींनीही साधला ‘विरुष्का’वर निशाणा, जोक वाचून चाहत्यांमध्ये हास्याचा कल्लोळ

महानायक अमिताभ बच्चन कामासोबतच त्यांच्या कमालीच्या सेन्स ऑफ ह्युमरसाठी देखील ओळखले जातात. ते दररोज सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसाठी गमतीदार पोस्ट्स शेअर करत असतात. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली यांना ‘पूर्ण मान’ देऊन त्यांच्यावर एक विनोद शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट पाहून, त्यांच्या चाहत्यांमध्ये हास्यांचा एकच कल्लोळ उडालाय.

वास्तविक, अमिताभ बच्चन यांना विरुष्कावर केलेला एक विनोद इतका आवडला की, त्यांनी तो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. तसेच, विनोद शेअर करत त्यांनी लिहिले की, ते या दोघांचा पूर्ण आदर करतात. बच्चन यांनी रंगीबेरंगी पोशाखात स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “रंग अजूनही उतरला नाही, आणि उत्सवाचे विनोद थांबले नाहीत. अनुष्का आणि विराट यांचा पूर्ण सन्मान करत… English: Anushka has a huge apartment ! हिंदीत: अनुष्का के पास विराट खोली है !”

बिग बींच्या या मजेदार पोस्टला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे आणि ते कमेंट्समधून त्यांना चिडवण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ते लवकरच ‘चेहरे’ या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबत इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत आहे. अलीकडेच चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ करण्यात आला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनेक रात्र रस्त्यांवर उपाशी काढलेला रेमो, आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर, वाचा त्याची संघर्षमय कहाणी

-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग

-‘हम युपी से है भैया!’ उत्तर प्रदेशातील असे कलाकार, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय बॉलीवूडचं पानही हलत नाही

हे देखील वाचा