Tuesday, March 5, 2024

अनेक रात्र रस्त्यांवर उपाशी काढलेला रेमो, आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर, वाचा त्याची संघर्षमय कहाणी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाने आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. आज त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने खूप मेहनतीने आज ही ओळख मिळवली आहे. अशात आज म्हणजे रविवारी (दि. 2 एप्रिल)ला रेमा त्याचा 49 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी लिझेल डिसूझा हिने रेमो सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोला त्याचे चाहते खूप पसंती दर्शवत आहेत. त्याच्या वाढदिवशी रेमो त्याच्या पत्नीसोबत घराच्या बाहेर स्पॉट झाला होता. काही दिवसांपूर्वीच रेमोला हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा त्याला लगेच कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले होते.

रेमो डिसूझाचा जन्म 2 एप्रिल, 1972 रोजी बंगळुरू येथे झाला होता. त्याचे खरे नाव रमेश गोपी हे आहे. खूप कमी जणांना त्याचे खरे नाव माहित आहे. त्याने त्याचे शालेय शिक्षण गुजरात येथे पूर्ण केले. पण त्यानंतर त्याने अर्धवट शिक्षण सोडले आणि तो मुंबईला आला. कदाचित तुम्ही ही गोष्ट वाचून हैराण व्हाल की, रेमोने आजपर्यंत डान्सचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. तो दिवंगत डान्सर मायकल जॅक्सन यांना त्याचा गुरू मानतो.

त्याच्यासाठी बंगळुरूमध्ये राहणाऱ्या साध्या रमेशपासून ते प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा हा प्रवास सोप्पा नव्हता. त्यासाठी त्याला खूप परिश्रम घ्यावे लागले. जेव्हा रेमो बॉलिवूडमध्ये त्याचं नाव कमावत होता,‌ त्यावेळी त्याच्याकडे पैशाची समस्या होती. त्याच्याकडे त्यावेळी अजिबात पैसे नसायचे, तेव्हा त्याने अनेक रात्र रस्त्यांवर उपाशी काढल्या आहेत. या प्रसंगात असताना त्याची ओळख लिझेलसोबत झाली. ते दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले. नंतर जाऊन त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. लिझेलने त्याच्या प्रत्येक प्रसंगात त्याची साथ दिली. वाईट प्रसंगात त्याची ढाल बनून ती त्याच्या पुढे उभी राहत असे.

त्यावेळी रेमोला जास्त काम देखील मिळत नसत. परंतु ‘रंगीला’ या चित्रपटाने त्याचं आयुष्य बदललं. या चित्रपटात त्याला डान्स करण्याची संधी मिळाली. त्यातील त्याचा डान्स सगळ्यांना खूपच भावला. त्यानंतर त्याने खूप मन लावून काम केले. त्याने सोनू निगम यांचा ‘दिवाना’ हा अल्बम कोरिओग्राफ केला. जो खूपच सुपरहिट झाला होता.

रेमो त्याची पत्नी लिझेल हिच्यावर खूप प्रेम करतो. त्याच्याकडे काहीच नव्हतं, तेव्हापासून तिने त्याला प्रत्येक प्रसंगात साथ दिली होती. रेमोने त्याची पत्नी लिझेलसोबत तीन वेळा लग्न केले आहे. 2019 मध्ये त्यांच्या लग्नाचा 20 व्या वाढदिवशी त्यांनी इसाई पद्धतीने लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये लिझेल ही गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये होती, तर रेमो निळ्या रंगाच्या सूटमध्ये होता.

रेमो ऑन स्क्रीन देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एबीसीडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. प्रेक्षकांना त्याचा हा चित्रपट खूपच आवडला होता. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. 2015 मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल ‘एबीसीडी 2’ प्रदर्शित झाला. यामध्ये श्रद्धा कपूर , वरुण धवन आणि प्रभू देवा हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील रेमो डिसूझा याने केले होते. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या व्यतिरिक्त त्याने ‘रेस 3’ आणि ‘फ्लाइंग जट’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याव्यतिरिक्त तो अनेक टीव्ही शोमध्येही जजची भूमिका साकारताना दिसला आहे. (remo dsouzas career journey his real name is ramesh gopi)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या सिंघमचा राजेशाही थाट! खासगी विमान ते कोट्यवधींच्या गाड्या, वाचा अजय देवगणची श्रीमंती

सिनेमात गुंडांच्या नाकी नऊ आणणाऱ्या अजय देवगणची ‘या’ गोष्टीमुळे टरकते, वाचा कोणती आहे ती गोष्ट

हे देखील वाचा