कल्की 2989 AD या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात प्रभास आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंतचे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अशातच अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाबाबत मोठे अपडेट दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत बिग बी या चित्रपटावर काम करत आहेत. याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केला आहे. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे नाग अश्विन दिग्दर्शित चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
त्यांनी लिहिले की, “पुन्हा उशीरा… कल्कीचे शूटिंग पूर्ण होत असल्याने मला कामावरून परतायला उशीर होत आहे… चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे… त्यामुळे सर्व काही ठीक आहे आणि शेवटचे प्रयत्न सुरू आहेत. निर्मात्यांनी प्रेक्षकांना काय वचन दिले आहे.”
चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेची एक छोटीशी झलक पाहायला मिळाली. त्याचा लूक पाहिला तर असे दिसते की, बिग बी दीर्घायुषी व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. त्याचा हा लूक लॉर्ड ऑफ द रिंग्ज मालिकेतील गंडाल्फची आठवण करून देणारा आहे. कल्की 2898 AD मध्ये कमल हासन देखील दिसणार आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
9 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाला संतोष नारायणन यांचे संगीत आहे. वैजयंती मुव्हीजचे सी अश्वनी या बिग बजेट चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अनेक भाषांमध्ये ते प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
आलिया भट्टच्या ‘या’ पात्रांनी दिला अभिनेत्री म्हणून दर्जा, जाणून घ्या सविस्तर
क्रिती सेननने लाईफ पार्टनरबाबत मांडले मत; म्हणाली, ‘मी एक प्रामाणिक, निष्ठावान जीवनसाथी शोधत आहे’