Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड Jhund | बिंग बींच्या फीमध्ये करण्यात आली कपात; अभिनेते म्हणाले, ‘माझ्या फीवर…’

Jhund | बिंग बींच्या फीमध्ये करण्यात आली कपात; अभिनेते म्हणाले, ‘माझ्या फीवर…’

बॉलिवूड चित्रपटसृष्टीचे बिग बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यात असलेल्या चांगुलपणाचे एक उदाहरण सध्या लोकांसमोर आले आहे. मराठी चित्रपट ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Popatrao Majule) यांच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटात, अमिताभ बच्चन यांनी आपल्या फीमध्ये कपात केल्याचे वृत्त समोर आले आहे.

सुप्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपट ‘झुंड’ हा स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आणि घटनांवर आधारित असून, यामध्ये अमिताभ बच्चन हे एका फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तत्पुर्वी चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी सांगितले की, “अमिताभ बच्चन यांचा या चित्रपटावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे चित्रपटाला अडचणी येऊ लागल्यावर बिग बींनी त्यांची फी कमी करण्याची ऑफर दिली. त्याबरोबरच या दिग्गज अभिनेत्याच्या टीमनेही बिग बींच्या पावलावर पाऊल टाकले आणि त्यांचा पगार कमी केला.” (amitabh bachchan slashes fees for jhund know reason here)

वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, “बच्चन सरांना ही स्क्रिप्ट खूप आवडली. माफक बजेट असलेल्या चित्रपटात त्यांना कसं कास्ट करायचं याचा विचार करत असताना त्यांची फी कमी करून त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. माझ्यावर खर्च करण्यापेक्षा चित्रपटावर खर्च करा, असे ते म्हणाले. यानंतर त्यांच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या फीमध्येही कपात केली.”

‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे हे मराठीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेत आहेत. याआधी त्यांच्या ‘सैराट’ आणि ‘फॅन्ड्री’ या चित्रपटांनी सर्वत्र धमाल केली आहे. ‘सैराट’ चित्रपटात देखील रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे मुख्य भूमिकेत होते. आता त्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्यात चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. चाहते आता चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

हेही वाचा – 

हे देखील वाचा