गेल्या ३४ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान संस्थेतर्फे चित्रपट, समाज, कला आदी क्षेत्रांशी निगडित व्यक्तींचा गौरव केला जातो. या वर्षीचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना 24 एप्रिल 2024 रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या पुण्यतिथीदिनी दिला जाणार आहे. रणदीप हुड्डा यांनाही यावर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने (विशेष पुरस्कार) सन्मानित करण्यात येणार आहे.
गेल्या ३४ वर्षांपासून मंगेशकर कुटुंबीय मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रातील कलागुणांचा गौरव करत आहेत. संस्थेतर्फे आतापर्यंत 200 जणांना गौरविण्यात आले आहे. यावर्षी अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- ए. आर रहमान (दीर्घ संगीत सेवा), मोहन वाघ पुरस्कार – गालिब नाटक (उत्कृष्ट नाट्य निर्मिती 2023-23), आनंदमयी पुरस्कार – दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – पद्मिनी कोल्हापुरे (दीर्घ चित्रपट सेवा), मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – रूप कुमार राठोड (दीर्घ संगीत सेवा), मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- रणदीप हुडा (उत्कृष्ट चित्रपट निर्मिती) यांना विशेष पुरस्कार. यंदा हा सन्मान सुमारे 11 जणांना देण्यात येणार आहे.
हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ‘मास्टर दीनानाथ हे उत्तम गायक, संगीतकार आणि नाट्य कलाकार होते. रंगमंचावर त्यांचे योगदान अतुलनीय आहे. महाराष्ट्र आणि भारतातील लोकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या स्मरणार्थ, मंगेशकर कुटुंब दिग्गजांना सन्मानित करण्यासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्काराचे आयोजन करते. या पुरस्कारांसाठी जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे.
रूप कुमार राठोड म्हणाले, ‘मला हा सन्मान मिळाला हे आमचे भाग्य आहे. माझ्या कठोर संगीताच्या सरावाचा हा परिणाम आहे. मंगेशकर कुटुंबाकडून संगीतासाठी हा सन्मान मिळणे माझ्यासाठी ऑस्कर आणि फिल्मफेअरपेक्षा कमी नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
दिया बालनने ‘ॲनिमल’वर शेअर केले तिचे मत, रणबीर कपूरच्या चित्रपटाबद्दल दिले हे मोठे वक्तव्य
‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा लक्षवेधक ट्रेलर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित