बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. ते चित्रपटसृष्टीत अनेक वर्षापासून कार्यरत आहे. अनेक चाहते त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड दिले आहे. पण एक वेळ अशी आली, जेव्हा ते मृत्यूशी झूंज देत होते. ‘कुली’ चित्रपटाची शूटिंग करताना अमिताभ बच्चन यांचा मोठा अपघात झाला होता.
‘कुली’ चित्रपटाचे शूटिंग २२जुलै १९८२ रोजी बंगलुरूमध्ये झाले होते. पुनीत इस्सर यांना अमिताभ यांना जोरात बुक्की मारायची होती. या सीनला अधिक रिअल दाखवण्यासाठी त्यांना पोटाला स्पर्श करायचा होता. मात्र काही सेकंद उशीर झाल्यामुळे त्यांची बुक्की जोरात अमिताभ यांच्या पोटात लागली. त्यावेळी सगळं सामान्य होतं. आराम करण्यासाठी अमिताभ हॉटेलमध्ये गेले. पण काही वेळातच त्यांना प्रचंड त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले. आठ दिवसांत त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण तरीही त्याची प्रकृती सुधारली नाही.
अमिताभ यांच्या शरीराला मुक्का मार लागल्याने डॉक्टरांनी त्यांना घरीच आराम करण्यास सांगितले. पण परत त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यावेळी रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. पण अमिताभ कोमात गेले होते. डॉक्टरांनी त्यांची पत्नी जया बच्चन यांना सांगितले की, बच्चन यांची प्रकृती खराब झाली आहे. तुम्ही त्यांना भेटून घ्या. जया ताबडतोब अमिताभला भेटायला आत गेल्या.
डॉक्टरांनी सांगितले होते, की अमिताभ यांच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नाही, पण जया यांनी अचानक पाहिले की अमिताभ यांचे पायाचे बोट हलत आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनीही तात्काळ पुढील उपचार सुरु केले. अमिताभ बच्चन यांचे प्राण वाचले. दरम्यान, जया बाहेर आल्या आणि त्यांना जाणवले की, हा देवाचाच काहीतरी चमत्कार आहे.
सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये जया यांनी सांगितले की, ज्या वेळी अमिताभ यांच्या पायाचे बोट हलले होते, त्यावेळी आयसीयूच्या शेजारी असलेल्या खोलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या म्हणाल्या होत्या, की हा देवाचा संकेत होता आणि देवाने अमिताभ यांना नवा जन्म दिला. महत्वाचे म्हणजे, शुद्धीवर आल्यानंतरही अमिताभ बच्चन यांना दोन महिन्यांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. २४ सप्टेंबर १९८२ रोजी ते आपल्या घरी पोहोचले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या
-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे