अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने केला नवीन फोटो शेअर, मामा अभिषेकसोबत बहिणीची लक्षवेधी कमेंट

बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे जेवढे चर्चेत असतात, तेवढेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने सोशल मीडियावरील त्याचे सर्व फोटो डिलीट केले होते. त्याने शनिवारी (12 जून) त्याचे नवीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो खूपच हँडसम दिसत आहे. अगस्त्यने आज त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सनकिस फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तो बेडवर झोपलेला दिसत आहे.

त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचे जॅकेट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. त्याच्या या फोटोला इंस्टाग्रामवर हजारो लाईक्स मिळाले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याच्या या फोटोवर कमेंट करून त्याच्या लूकचे कौतुक केले आहे.

अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने या फोटोवर कमेंट करून लिहिले आहे की, “हँडसम.” याव्यतिरिक्त अगस्त्यची बहीण नव्या नवेली हिने कमेंट केली आहे की, “अग्ग्लू.” यासोबतच अभिषेक बच्चन आणि झोया अख्तर यांनी देखील त्याच्या या फोटोचे कौतुक केले आहे.

अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा आणि व्यावसायिक निखिल नंदा यांचा मुलगा आहे. माध्यमातील वृत्तानुसार, मागच्या वर्षी त्याची आई श्वेता नंदा हिने त्याची चित्रपटसृष्टीत येण्याची हिंट दिली होती. परंतु अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

https://www.instagram.com/p/CP_9d4hMOlU/?utm_source=ig_web_copy_link

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिने तिच्या बालपणीचे काही फोटो शेअर केले होते. यामध्ये दोघे बहीण- भाऊ गाडीत झोपताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली होती.

नव्या नवेली ही एक ‘आरा हेल्थ’ नावाची संस्था चालवते. तिची ही संस्था मानसिक स्वास्थ आणि त्या संबंधित जोडलेल्या अनेक अडचणी याप्रती लोकांना जागरूक करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

Latest Post