Monday, February 26, 2024

विक्रम गोखले यांच्या कठीण काळात बिग बींनी दिलेली साथ, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिले होते पत्र

मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विक्रम गोखले यांची तब्येत खालावली होती, त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु केले होते. मात्र, दि, 26, नोव्हेंबर रोजी अचानकच त्यांची तब्येत खालावली आणि शेवटी त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी जगाला राम राम ठोकला. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत काम केले होते. मात्र, त्यांच्या कठीण परिस्थितीत त्यांना अमिताभ बच्चन यांनीच मदतीचा हात दिला होता.

अभिनेता विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबरला झाला होता. दिग्गज अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी चित्रपाटामध्ये जास्त तर गंभीर भूमिका स्वीकराताना पाहिले आहे. त्यांच्या अशा काही भूमिका आहेत ज्याचे कौतक आजही केले जाते. जेव्हा विक्रम यांनी अमिताभ बच्चन यच्यासोबत ‘अग्निपथ’ चित्रपटामध्ये देखिल काम केले आहे. तेव्हा त्यांनी एका मुलाखतीदरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्यासोबतचा रंजक किस्सा सांगितला होता.

विक्रम गोखले यांनी किस्सा शेअर करत सांगितले की, “जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला होता, तेव्हा मला खूप संघर्ष कारावा लागला. माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि मी मुंबईमध्ये एक घर शोधत होतो, ही गोष्ट जेव्हा अमिताभ बच्चन यांना समजली तेव्हा त्यांनी स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना पत्र लिहिले. त्यांच्या मदतीने मला सरकारकडून घर मिळाले. माझ्याकडे अजूनही ते पत्र असून मी त्याला फ्रेम करुन ठेवले आहे.”

विक्रम गोखले हे कालविश्वातील खूप दमदार कलाकार होते, ते कोणतीही भूमिका सहजच पेलत होते. त्यांनी चित्रपट आणि टेलिव्हिजनच नाही तर थेटरमध्येही काम केले. त्यांचा पहिला चित्रपट ‘परवाना’ 1971 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर त्यांनी 1999 मध्ये संजय लिला भन्साळी (Snajay Leela Bhansali) यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपाटामध्येही झळकले होते. यामध्ये त्यांनी एश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bacchan) हिच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्याशिवय त्यांनी ‘अग्निपथ’, ‘दिल से’, ‘भूल भुलैया’, ‘दे दना दन’, ‘हिचकी’, ‘मिशन मंगल’ सारख्या अनेक चित्रपटामध्ये काम केले होते. (Amitabh Bachchan support during Vikram Gokhale difficult time was written directly to the Chief Minister)

आधिक वाचा-
‘पिंगा’ गाण्यावर अभिनेत्री जान्हवी कपूरने लावले ठुमके, लूक पाहून चाहते झाले वेडे
विक्रम गोखले बनले होते विश्वसुंदरी ऐश्वर्याचे ‘वडील’, अभिनयाने गाजवली तब्बल 4 दशके

हे देखील वाचा