अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे मराठी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी ते सिने जगतात विशेष प्रसिद्ध आहेत.त्यांनी साकारलेल्या ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजल्या आहेत. सध्या त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे. काय आहे हा नेमका किस्सा चला जाणून घेऊ.
अभिनेते अमोल कोल्हे आपल्या अभिनयाइतकेच सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांचे आठवणीतील किस्से सांगत असतात. अभिनेते अमोल कोल्हे राज्याच्या राजकारणातही सक्रिय सहभाग घेतात. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते तसेच शिरुर मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत. कामानिमित्त राज्यात फिरताना त्यांना अनेक किस्से, प्रसंग अनुभवायला मिळत असतात. असाच एक किस्सा त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितला आहे.
View this post on Instagram
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या अचानक भेटलेल्या कार्यकर्त्याची आठवण सांगितली आहे. यामध्ये ते म्हणतात की, “खरंतर रस्त्यावरचं ट्राफीक चुकविण्यासाठी आपण रेल्वेचा पर्याय निवडतो आणि रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर असलेल्या गर्दीतून वाट काढताना अचानक अमोलभाऊ अशी हाक कानावर येते. आणि समोर एक अनोळखी चेहरा, अगदी ओळखीचं स्मितहास्य देत असतो. आणि कळलं की हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता भानुदास कदम. आणि भानुदास भाऊंनी आपुलकीने विचारलं, “गाडी आहे की माझ्या गाडीतून येणार..?” आणि त्यांच्या गाडीतली आजची सवारी ही ग्राउंड लेवलला काय चाललंय, काय घडतंय या सगळ्याची खूप जास्त माहिती देणारी होती. भानुदासजी! तुमच्या या आपुलकीबद्दल, मायेबद्दल आणि तुमच्या सूक्ष्म राजकीय निरीक्षणाबद्दल मनःपूर्वक आभार.”
दरम्यान अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत त्यांचे कौतुक केले आहे. अमोल कोल्हे यांच्या अभिनय कारकिर्दिबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी स्वराज्यरक्षक संभाजी, राजा शिवछत्रपती, अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा –
स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास
‘हँडसम हंक’ कुणाल कपूर आणि बच्चन घराण्यात नक्की नातं आहे तरी काय?