‘हँडसम हंक’ कुणाल कपूर आणि बच्चन घराण्यात नक्की नातं आहे तरी काय?


कोणताही पाठिंबा नसताना स्वबळावर बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता कुणाल कपूर. कुणालने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिकांना प्राधान्य दिले. कुणालने कमी पण लक्षात राहणारे चित्रपट केले. २००४ साली ‘मीनाक्षी’ सिनेमातून कुणालने सिनेसृष्टीत पदार्पण केले. २००६ साली आलेल्या ‘रंग दे बसंती’ चित्रपटातल्या त्याच्या ‘अस्लम’ भूमिकेसाठी त्याला फिल्मफेयर पुरस्काराचे सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका प्रकारात नामांकनही मिळाले होते.

कुणालने २०१५ मध्ये नयना बच्चन म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या पुतणीसोबत लग्न केले. नयना बच्चन ही अमिताभ बच्चन यांचे बंधू अजिताभ बच्चन यांची मुलगी. कुणाल आणि नयना यांची पहिली भेट करण जोहरच्या फॅशन शो मध्ये झाली. या भेटीबद्दल सांगताना कुणालने सांगितले की, ‘२०१२ मध्ये नयना ही श्वेता बच्चन सोबत तो फॅशन शो पाहायला आली होती, आणि मी त्या शो मध्ये रॅम्प वॉक केला. तेव्हा आमची पहिली भेट झाली.’

नयना त्यांच्या पहिल्या भेटीनंतर कुणालचे ‘रंग दे बसंती’, ‘लव शव ते चिकन खुराना’, ‘लम्हा’ हे सिनेमे पाहिले. त्याच्या चित्रपटातील गाणे ऐकून नयना त्याच्या प्रेमात पडली. नयनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “मी जेव्हा पहिल्यांदा कुणालला भेटले, तेव्हा त्याला बघून मी मनातल्या मनात वॉव, टॉल, डार्क अँड हॅण्डसम हे शब्द उच्चारले. मात्र नंतर भेटीतून उलगड गेले, की तो त्याच्या लूक्सपेक्षा खूप चांगली व्यक्ती आहे.” नयना आणि कुणाल काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिलेत. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये लग्न केले. या लग्नाला बच्चन परिवारासह अनेक कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.

कुणाल जरी बॉलिवूडमध्ये कमी दिसत असला तरी तो साऊथच्या सिनेमात कार्यरत आहे. कुणालने आतापर्यंत हिंदी सोबत तेलगू आणि मल्याळम भाषेतही कमी केले आहे. विशेष म्हणजे कुणालने २००१ मध्ये आलेल्या ‘अक्स’ सिनेमात सहायक दिग्दर्शक म्हंणून ओम प्रकाश मेहरा यांच्यासोबत काम केले. कुणाल नेहमी त्याचे आणि नयनाचे फोटो सोशल मीडियावर टाकत असतो.


Leave A Reply

Your email address will not be published.