Thursday, April 18, 2024

‘अशी’ आहे बॉलिवूडच्या मोगॅंबोच्या आयुष्याची खरी कहाणी, जाणून घ्या अमरीश पुरी यांच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

हिंदी चित्रपटसृष्टीत (bollywood) अनेक कलाकारांनी खलनायकाच्या भुमिका केल्या, परंतु अमरीश पुरीने (Amrish puri) खलनायक म्हणुन स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. खलनायक असून देखील लोकांच्या मनावर राज्य करणारा तो एकमेव कलाकार आहे असं म्हणलं तरी त्यात काही वावगं ठरणार नाही. अमरीश पुरी हा असा अभिनेता होता जो त्याच्या प्रत्येक भुमिकेत त्याचा जीव ओतायचा आणि कदाचित याच कारणामुळे तो आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आज 12 जानेवारी 2024 म्हणजेच सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या या कलाकाराची 19 पुण्यतिथी. आज यानिमित्त देशभरातील हजारो चाहते त्यांची आठवण काढत आहेत.

आमरिश पुरींनी (Amrish puri) त्यांच्या 30 वर्षांच्या करियरमध्ये 350 पेक्षा अधिक चित्रपटांंमध्ये काम केलं आहे. ते हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात सफल खलनायक(villain) म्हणून ओळखले जातात. ते त्यांच्या काळातील सर्वात जास्त फी घेणारे खलनायक होते. पडद्यावर जरी ते खलनायकाची (Mogambo) भुमिका करत असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते खुप हसी-मजाक करणारे व्यक्ती होते. ते खुप मोठ्या मनाचे होते असं त्यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात

दारु आणि विवादापासुन नेहमीच असायचे लांब
मोठ्या पडद्यावर नेहमी दारुचा ग्लास हातात दिसणाऱ्या अमरीश पुरींच्या प्रत्यक्ष आयुष्याचं चित्र मात्र फार वेगळं होतं. तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटेल की पडद्यावर नेहमी ते मद्यपान करताना दिसायचे परंतु ते खऱ्या आयुष्यात मात्र मद्यपाणापासून नेहमी लांब राहायचे . इतकंच नाही तर त्यांनी दारूला कधी हात देखील लावला नाही. दारूसोबतंच ते विवादापासून देखील नेहमीच लांब असायचे.

इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच नाव कधाही कोणत्या भांडणात किंवा वादात आलेलं नाही. चित्रपटात ते अनेक खतरनाक गोष्टी करायचे मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यात ते खुप शांतताप्रिय व्यक्ती होते. त्यांचं कधी कोणत्या अभिनेत्रीसोबत देखील नाव जोडलं गेलं नाही.

चित्रपटात काम मिळण्यापुर्वी ते बँकेत काम करायचे, जिथे त्यांची ओळख उर्मिला दिवेकर यांच्याशी झाली होती. त्यानंतर हळुहळु त्यांच्यात प्रेम निर्माण झालं. परंतू, उर्मीला दक्षिण भारतीय कुटुंबातील होते तर आमरीश पंजाबी कुटुंबातले. त्यामुळे सुरूवीतीला त्यांचे कुटुंब लग्नासाठी तयार नव्हते. परंतु,नंतर परिवाराच्या मान्यतेने त्यांचं लग्न झालं

आमरीश पुरींचा जन्म 22 जून 1932 रोजी झाला. त्यांनी त्यांच्या करियर ची सुरुवात 1971 मध्ये रेशमा आणि शेरा या चित्रपटांतुन केली.त्यानंतर आमरीश पुरींनी कधीही मागे वळुन पाहिले नाही. 12 जनवरी 2005 मध्ये त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आणि 72 वर्षांच्या वयात त्याचा मृत्यु झाला. आमरीश पुरींच्या मृत्युमुळे संपुर्ण बाॅलीवूडवर शोककळा पसरली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता, आगामी ‘कल्की’ सिनेमाला मिळाली सेन्सर बोर्डाची परवानगी
प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता, आगामी ‘कल्की’ सिनेमाला मिळाली सेन्सर बोर्डाची परवानगी

हे देखील वाचा